शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतील बालकांना शाळेचे दर्शन दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST

अमरावती : सर्वत्र हाहाकार माजवून सोडलेल्या कोरोना संकटाने सर्वांचेच टेन्शन वाढविले असताना शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. ...

अमरावती : सर्वत्र हाहाकार माजवून सोडलेल्या कोरोना संकटाने सर्वांचेच टेन्शन वाढविले असताना शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच्या पहिल्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंगणवाडी, बालवाडीतील गतवर्षातील विद्यार्थ्यांसह यावर्षीच्याही विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचे दर्शन दुर्लभच होणार आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गेल्यावर्षी पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तसेच सत्राच्या शेवटी परीक्षा न देता पुढील वर्गासाठी ते पात्र ठरले. परंतु अंगणवाडी, बालवाडीतील विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना आपल्या हातात वही, पाटी-पेन्सिल न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. त्या सर्वांनी आपल्या शिक्षकांसह शाळेचेही वर्षभरात तोंड पाहिलेले नाही. प्राथमिक विद्यार्थ्यांना त्या वर्गाचा अभ्यास तर सोडाच परंतु शाळा व तेथील शिक्षकांची ओळख देखील न होता त्यांनी दुसऱ्या वर्गात प्रवेश केला आहे. त्यामुळे इतर पालकांची चिंता अधिक वाढली आहे. यावर्षी लहान मुलांवर कोरोनाचे भयंकर संकट ओढवणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे जूनपासून शाळा नेहमी सुरू होणे अशक्य आहे. विद्यार्थ्यांना अक्षर ओळख, अंकज्ञान व अन्य विषयाचे ज्ञान न होता त्यांना पुढील वर्गात बसविणे पालकांना धोक्याचे वाटते. ऑनलाईन शिक्षणाचा विचार केल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांना अद्याप अँड्रॉईड मोबाइल उपलब्ध झालेला नाही. हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ते मोबाईल विकत घेऊ शकत नाहीत. प्रत्येक गावात मोबाईलची रेंज नाही. असे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहापासून वर्षभर तरी दूर आहेत. वर्गातील प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाईन शिक्षणात फरक पडत असून प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा मोबाईलवरील खेळ व अनेक गोष्टीत अधिक रस वाटतो. पालक व शिक्षकांचे लक्ष चुकवून ते अशा गोष्टी करीत असतात. आनलाईन शिक्षण त्यांच्या पचनी पडण्यासाठी काही अवधी लागेल.

कोट

माझा मुलगा मागील वर्षी पहिलीत गेला. तो शाळेत न जाता पास झाला. आता यावर्षी शाळेची व शिक्षकांची ओळखही न होता तो दुसरीत जाईल. त्याच्या ज्ञानाचे काय?

अतुल कावरे, पालक