सर्व्हर रूम जळाली : महत्त्वाचे दस्तऐवज खाक, लाखोंची हानी अमरावती : आंध्रा नॅशनल बँकेला लागलेल्या आगीत कॉम्प्युटर, सर्व्हर रूम व अनेक महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले. ही घटना गांधी चौक ते जवाहर गेट मार्गावरील दत्ता पॅलेसमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीे घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसानाचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नामुळे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आली.स्टँगरुम मध्ये जे लाटो रुपये होते. थोडक्यात बचावली, अन्यथा लाखो रुपये रुपये जळून खाक झाले असते. रात्रीे १२ वाजतादरम्यान बँकेच्या इमारीतून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती अग्निशामन दल व कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून तेथील बॅटरीकचादेखील स्फोट झाल्याने आगीने रोद्ररुप धारण केले होते. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या फायरमन व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी अमरावती अग्निशामनचे तीन बम्ब पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. बँकेच्या काचा फोडून आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा केला. वेळीच अग्निशनमन दलाला पाचारण केल्यामुळे १२.३० वाजता दलाचे कर्मचारी दाखल झाले. रात्री २.३० वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. अग्निशमन विभागाचे वरिष्ठ फायरमन सय्यद अनवर, वाहन चालक राजेंद्र लोणारे, चव्हाण, अजणे, फायरमन एम. बी. यादव, विलास उमेकर सोहन कांबळे आदींनी आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी कोतवालीचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. मोठी हानी टळलीआंध्रा बँकेला रात्री उशिरा आग लागली. वेळीच अग्निशामन दल दाखल झाल्याने आग विझविण्यात यश आले आहे. सर्व्हर रुममधील बॅटरीकचे स्फोट झाल्याने आगीने रोद्ररुप धारण केले होते. यामध्ये कॉम्प्युटर्स फर्निचर व महत्त्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले. ही आग कॅशरुमपर्यंत पोहोचली असती मोठे नुकसान झाले असते. यावेळी बँकेचे व्यवस्थापक पवार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनीहीे आग विझविण्याकरीता प्रयत्न केले. सिटी कोतवाली पोलिसांनी केला पंचनामासिटी कोतवाली पोलीस स्टेश्नचे पोलीस निरीक्षक किशोर सुर्यवंशी यांनी शनिवारी जळालेल्या बँके चा पंचनामक केला व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नेमके किती नुकसान झाले आहे. हे अद्याप स्पष्ठ झाले.बँकेचा महत्त्वाचा डाटा सुरक्षित आहे. स्ट्राँग रुममुळे पैसेही सुरक्षित आहेत. दोन दिवसांत दुरुस्तीनंतर बँकेचे कारभार सुरळीत सुरू होणार आहे. - अमोेल पवार, व्यवस्थापक, आंध्रा बँक
आंध्रा बँकेला आग
By admin | Updated: July 30, 2016 23:55 IST