लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : गत शुक्रवारी चिखलदरा पोलीस ठाण्यामध्ये अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या एका कर्मचाºयाने नगरपरिषदेचे महत्त्वाचे दस्तऐवज हरविल्याची तक्रार नोंदविली. दरम्यान याची वाच्यता होताच खळबळ उडाली. चार दिवस नगर परिषदेचे कर्मचारी हरविलेली फाईल शोधत होते. दरम्यान ५ आॅक्टोबर रोजी दस्तऐवज अंजनगाव पोलिसांना अचानक सापडले.यात प्रशासनिक षड्यंत्र असून नगर परिषदेत वाढता भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनीच हा डाव खेळला, अशी चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिल्यास यात प्रशासकीय दिरंगाई कारणीभूत असल्याचे मत नगर परिषदेतील कर्मचाºयांनी व्यक्त केले.अंजनगाव सुर्जी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रशांत रोडे मागील गुरुवारी कार्यालयात हजर होते. शुक्रवारी त्यांनी स्वाक्षरी करण्याकरिता कागदपत्रे चिखलदरा येथे बोलावून घेतले. आरोग्य विभागाची कागदपत्रे संबंधित विभागाच्या कर्मचारी किंवा अधिकाºयाने घेऊन जाणे अपेक्षित असताना ती कागदपत्रे दुसºयाच विभागातील कर्मचाºयांच्या हस्ते पाठविण्यात आली. दरम्यान कागदपत्रे गहाळ झाल्याचे लक्षात येताच याची तक्रार चिखलदरा पोलीस ठाण्यात केली. याची माहिती नगरपरिषदेतील कर्मचाºयांना होताच एकच खळबळ उडाली. कर्मचारी युद्धस्तरावर कामाला लागले. परंतु यश आले नाही. मात्र, अचानक ही कागदपत्रे अंजनगाव सुर्जी पोलिसांना अचानक सापडल्यामुळे याविषयी अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.मूळ भ्रष्टाचारात?या प्रकरणाचे मूळ भ्रष्टाचारात लपलेले असल्याची चर्चा आहे. आरोग्य विभागासंदर्भात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारींची साक्ष देणारे हे दस्तऐवज होते. यामुळे ही कागदपत्रे तपासून संबंधित कर्मचाºयावर कारवाई होणार असल्याची चर्चा नगर परिषदेत होती. चार दिवसांनंतर अचानक कागदपत्रे सापडणे व कामात दिरंगाई करण्याप्रकरणी मुख्याधिकाºयांकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने अनेकविध चर्चा नगर परिषदेत रंगल्या आहेत.म्हणे, काही कागदपत्रे हरविलीहरविलेली कागदपत्रे पथ्रोट ते परतवाडा मार्गावर एका ठिकाणी सापडली. हे दस्तऐवज आरोग्य निरीक्षक मनोहर सावरकर यांना सोपविण्यात आले. यावेळी त्यांनी यातील दोन फाईल व काही व्हाऊचर गहाळ झाल्याचे ठाणेदारांना सांगितले होते. मात्र, अचानक सर्व दस्तऐवज त्यात असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी व आरोग्य निरीक्षक यांनी दिली.नगरपरिषदेत तक्रारमहत्त्वाचे दस्तऐवज गहाळ होण्याची घटना यापूर्वी अंजनगाव पालिकेत घडली आहे. अशा गंभीरप्रकरणी कोणतीही कार्यवाही झाली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व भ्रष्ट अधिकाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार ४ आॅक्टोबर रोजी गजानन हुरबडे यांनी नगर परिषदेला दिली आहे. मात्र यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.चिखलदरा पोलिसांच्या सूचनेनंतर आम्ही चौकशी करीत होतो. ५ तारखेला पथ्रोट ते परतवाडा मार्गावर एका ठिकाणी पिशवीत दस्तऐवज आढळून आले. आम्ही ते नगरपरिषदेच्या अधिकाºयांकडे सुपूर्द केले.- सुधीर पाटील,ठाणेदार, अंजनगाव सुर्जीअंजनगाव पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रारीत उल्लेख असलेली सर्व कागदपत्रे पिशवीत आहेत. हे सर्व महत्त्वाचे दस्तऐवज होते. मात्र, दस्तऐवज कसे हरविले, याची आम्ही चौकशी करीत आहोत.- प्रशांत रोडे,प्रभारी मुख्याधिकारी, अंजनगाव सुर्जी
अन् हरविलेले दस्तऐवज सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:14 IST
गत शुक्रवारी चिखलदरा पोलीस ठाण्यामध्ये अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या एका कर्मचाºयाने नगरपरिषदेचे महत्त्वाचे दस्तऐवज हरविल्याची तक्रार नोंदविली.
अन् हरविलेले दस्तऐवज सापडले
ठळक मुद्देअंजनगाव नगर परिषदेची कागदपत्रे : चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार, भ्रष्टाचाराचे आरोप