शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

...आणि अस्मितेसाठी नेते विसरले पक्षभेद !

By admin | Updated: September 23, 2016 00:13 IST

कोपर्डी बलात्कार खटल्यातील आरोपींना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरूस्ती, मराठा आरक्षण आदी मागण्यांसाठी गुरूवारी मराठ्यांनी जाज्वल्य एल्गार पुकारला.

एकजुटीचे ऐतिहासिक दर्शन : मोर्चाचा मार्ग भगवामयअमरावती : कोपर्डी बलात्कार खटल्यातील आरोपींना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरूस्ती, मराठा आरक्षण आदी मागण्यांसाठी गुरूवारी मराठ्यांनी जाज्वल्य एल्गार पुकारला. या मोर्चात पक्षभेद विसरून मराठा नेते एकवटल्याने एकजुटीचे आगळेवेगळे दर्शन घडले. नेहरू मैदान ते गर्ल्स हायस्कूल चौक गर्दीने नुसता फुलून गेला होता. भगव्या झेंड्यांनी आसमंत झळाळला होता. महिनाभरापासून मराठा मूकमोर्चासाठी नियोजनाची प्रक्रिया राबविली होती. ते नियोजन किती काटेकोर होते, याची प्रचिती मोर्चा निघाल्यानंतर आली. स्वंयसेवकांची फौज शहरात ठिकठिकाणी तैनात होती. शहराच्याच नव्हे, तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा तरूण-तरूणींनी स्वयंसेवा देण्यासाठी पुढाकार घेतला होता. परिणामी मोर्चात कुठेही गोंधळ निर्माण झाल्याचे आढळले नाही. सात तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या महामोर्चाचे नेतृत्व राजकीय पुढाऱ्यांऐवजी सामान्य कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आले होते. विनानेतृत्व निघालेल्या या मोर्चातील महिलांचा लक्षणीय सहभाग बोलका ठरला. मराठा समाजातील वकील, अभियंते, डॉक्टर, नोकरदारवर्गाचा मोर्चातील सहभाग लक्षात घेता मराठा समाजाच्या भावना किती तीव्र आहेत, याची जाणीव होत होती. मूकमोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाचे नेतेदेखील मागे नव्हते, हे विशेष. मोर्चात प्रामुख्याने पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, मोर्शीचे आ.अनिल बोंडे, धामणगाव रेल्वेचे आ.वीरेंद्र जगताप, तिवस्याच्या आ.यशोमती ठाकूर, अकोटचे आ.प्रकाश भारसाकळे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, माजी आमदार सुलभा खोडके, भाजपाच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, आ.सुनील देशमुख यांच्या अर्धांगिनी डॉ.सोनाली देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बंड, प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, चेतन पवार, शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, शिवसेना समर्थित नगरसेवक प्रदीप बाजड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे, महापालिका काँग्रेसच्या नगरसेविका अर्चना इंगोले, मिलिंद बांबल, नूतन भुजाडे, जनविकास काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता झाडे, माजीमंत्री शरद तसरे, मोर्शीचे अशोक रोडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वृषाली विघे, काँग्रेसच्या नेत्या पुष्पाताई बोंडे, सुरेखा लुंगारे, विलास इंगोले, राजेंद्र महल्ले, बंडू हिवसे, धीरज हिवसे, अमोल ठाकरे, दिनेश बूब, प्रल्हाद ठाकरे, शिवसेनेचे नाना नागमोते, बाळासाहेब हिंगणीकर, राजेंद्र तायडे, गजानन वाकोडे, महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे पप्पू पाटील, मयुरा देशमुख, भाजपा नेते रुपेश ढेपे, संध्या टिकले, प्रकाश अढाऊ, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती गिरीश कराळे, अमरावती पंचायत समितीचे सभापती आशिष धर्माळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे, जि.प. सदस्य ममता भांबुरकर, मोहन पाटील, उमेश केने आदी मराठा नेत्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)