शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

अन् कापूस, ऊस, कांद्याचे दर झाले जाहीर

By admin | Updated: December 13, 2015 00:08 IST

शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलन अंगार झाले होते. १९८० सालच्या १४ डिसेंबरचा तो दिवस. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सात लाख शेतकऱ्यांच्या सभेला शरद जोशी संबोधित करीत होते.

श्रीकांत तराळ : मुख्यमंत्री अंतुलेही नमले; शरद पवार, यशवंतराव चव्हाणांना पोहऱ्यात अटकअमरावती : शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलन अंगार झाले होते. १९८० सालच्या १४ डिसेंबरचा तो दिवस. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सात लाख शेतकऱ्यांच्या सभेला शरद जोशी संबोधित करीत होते. सभास्थळावरून हेलिकॉप्टर भिरभिरत होते. अर्ध्या सभेत जिल्हाधिकारी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी २० डिसेंबरला वाटाघाटीसाठी बोलविल्याचा निरोप त्यांनी दिला. सभा संपली. २० डिसेंबरला वर्षा बंगल्यावर वाटाघाटी सुरू झाल्यात. शरद पवारांची दिंडी अमरावती जिल्ह्यातील पोहरा जंगलात दाखल झाली होती. वाटाघाटीचा तासभराचा अवधी उलटतो न उलटतो तोच शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना एसटीबसमध्ये बसविले. राजकीय कारकिर्दीदरम्यान पहिल्यांदाच ते एसटी बसते बसले होते. त्यांना तुरुंगात रवाना करण्यात आले. तिकडे एकाचवेळी कापसाला ७००, काद्यांला १०० आणि ऊसाला ३०० रुपये हमीभाव घोषित झाला. देशाच्या इतिहासातील ते पहिले उदाहरण होते. शासनाने खरेदी केंद्रे सुरू करून खरेदीही आरंभली. वर्षा बंगल्यावरील त्या वाटाघाटीचे श्रीकांत तराळ साक्षीदार आहेत. शरद जोशी नावाच्या वादळाची सुरुवात ज्या काळात झाली त्याच काळात त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संघर्षात समर्थसाथ देणाऱ्या तराळ यांनी गहिवरून ही आठवण लोकमतला सांगितली.मराठ्यांचे पानिपतसाहेबांसोबत एकदा दौऱ्यावर होतो. प्रवासादरम्यान आम्ही पानिपतला पोहोचलो. रात्री दीड वाजले होते. पेंगत पेंगत आम्ही लक्झुरीतून उतरत होतो. सोबत विजय जावंधिया आणि भास्करराव बोरावसे हेदेखील होते. पायऱ्या उतरत असताना साहेंबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला नि म्हणाले, 'श्रीकांत पाऊल जरा जपून टाक. हे पानीपत आहे. मराठ्यांनी येथे चोपून मार खाल्ला होता' साहेंबांच्या त्या वाक्याने सर्वच खळाळून हसले. जांभई देत उतरतानाही त्यांची तल्लख विनोदबुद्धी अशी कार्यरत राहत असे. त्यांच्या अचाट वाचनाचा उपयोग ते जसा सरकारला नमवायला करीत असे तसाच तो वातावरण हलके फुलके करण्यासाठीही करायचे. - आणि पत्रकारांनी वाजविल्या टाळ्या७ डिसेंबर १९८० चा दिवस. शरद जोंशींच्या विदर्भ दौऱ्याची सांगता नागपुरात झाली. नागपूरच्या टीळक पत्रकार भवनात मी शरद जोशी यांची पत्रपरिषद आयोजित केली होती. त्याचवेळी शरद पवारांची पायी शेतकरी दिंडी जळगावहून निघालेली होती. पत्रकारांनी प्रश्न विचारला. पवारांच्या दिंडीबाबत आपले मत काय? शरद जोशी यांनी त्यावर दिलेले उत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, एक जुना मुख्यमंत्री एका नवीन मुख्यमंत्र्याला मागून मागून काय मागेल? आणि त्या दिंडीत माझ्या शेतकऱ्यांना पायी चालावे लागणार आहे. त्यामुळे त्या दिंडीला ना माझा विरोध आहे ना माझे समर्थन. यावर पत्रकारांनी टाळ्या वाजविल्या.