शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अन् बोलू लागले प्राण्यांचे सांगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 00:04 IST

कठोरा मार्गावरील एका शेतशिवारात मंगळवारी पाच वन्यप्राण्यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला.

वनविभाग अनभिज्ञ : विद्युत प्रवाहित तारांमुळे यापूर्वीही अनेक मृत्यू?वैभव बाबरेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कठोरा मार्गावरील एका शेतशिवारात मंगळवारी पाच वन्यप्राण्यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर याच परिसरात आणखी काही वन्यप्राण्यांचे सांगाडे आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे हे सत्र बरेच आधीपासून सुरू असल्याचे दिसून येते. मृत वन्यपशुंचे सांगाडेच जणू त्यांची आपबिती कथन करीत आहेत. मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास वनविभागाला मृत वन्यप्राण्यांबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वनविभागाने पंचनामा करून शेतमालकावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वन्यपशुंचे घटनास्थळीच शवविच्छेदन करून त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. ही प्रक्रिया सायंकाळपर्यंत चालली. ही प्रक्रिया सुरू असताना वनविभागाला घटनास्थळापासून काही अंतरावर असणारे वन्यप्राण्यांचे सांगाडे देखील दिसून पडलेत. यामुळे याठिकाणी यापूर्वी देखील वन्यपशुंचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची बाब उघड झाली आहे. वन्यप्राणी अन्न-पाण्याच्या शोधात शहरालगत शेतशिवारांपर्यंत पोहोचतात. शेतीच्या धुऱ्यावर लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन अनेकदा ते दगावतात. या घटना यापूर्वी देखील घडल्या असाव्यात, असे येथे आढळलेल्या वन्यपशुंच्या सांगाड्यावरून दिसून येते. संजय महल्लेला न्यायालयीन कोठडीशेतमालक संजय महल्ले यांनी शेताच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडला होता. यातारांचा स्पर्श झाल्याने पाचही वन्यप्राणी दगावले. वनविभागाने याप्रकरणी संजय महल्लेला बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीकडेही तक्रारशेताजवळील विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेऊन विजेचा प्रवाह कुंपणात सोडण्यात आला होता. शेतात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या वन्यपशुंना विजेचा धक्का बसला व त्यांचा मृत्यू झाला. शेतमालक महल्लेने अनधिकृत वीजजोडणी घेतल्याचा संशय वनविभागाला असून यासंदर्भात त्यांनी विज वितरण कंपनीकडे तक्रार सुध्दा केली आहे. वीजजोडणी अनधिकृत आढळल्यास वीज कंपनीकडूनही संजय महल्लेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. कास्तकारांना पुन्हा देणार सूचनाजंगलाशेजारच्या शेतांमध्ये शिरून वन्यप्राणी पिकांचे नुकसान करतात. यासाठी शेतमालक कुंपणात विद्युत प्रवाह सोडतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो. हा गंभीर प्रकार वनगुन्ह्यात मोडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या धुऱ्यावर विद्युत तारा लावू नयेत, याबाबत वनविभागाकडून शेतकऱ्यांना सातत्याने सूचना देण्यात येतात. मात्र, तरीही हे प्रकार घडत असल्याने पुन्हा जंगलालगतच्या शेतकऱ्यांना सूचना देण्यात येणार आहे. विद्युतप्रवाहित तारांचा स्पर्श झाल्यामुळे पाचही वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. घटनास्थळी आढळलेले वन्यप्राण्यांचे सांगाडेही जप्त केले आहेत. - एच.व्ही.पडगव्हाणकर, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी.