शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

लासूरच्या आनंदेश्वर मंदिरालगत खोदकामात सापडल्या देवतांच्या प्राचीन मूर्ती

By admin | Updated: September 21, 2015 00:08 IST

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात लासूर येथे यादवकालीन ८०० वर्षांपूर्वीच्या आनंदेश्वर मंदिराच्या मागील भागात खोदकामादरम्यान शनिवारी ४ देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत

पुरातत्त्व विभाग करणार पाहणी : यादवकालिन ८०० वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी मंदिरसंदीप मानकर दर्यापूरअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात लासूर येथे यादवकालीन ८०० वर्षांपूर्वीच्या आनंदेश्वर मंदिराच्या मागील भागात खोदकामादरम्यान शनिवारी ४ देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. काळ्या पाषाणावर कोरीव व सुबक अशा या मूर्ती सध्या मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सोमवारनंतर याची पाहणी करणार आहे. या मूर्तींमुळे प्रख्यात आनंदेश्वर मंदिराच्या प्राचीन इतिहासाची आणखी काही पाने उलगडणार आहेत. दर्यापूर येथील लासूर येथे काळ्या पाषाणाचे अभेद्य किल्यासारखे दिसणारे ८०० वर्षांपूर्वीचे महादेवाचे मंदिर व प्राचीन शिवलिंग याठिकाणी आहे. सध्या मंदिराचा जीर्णोद्धार पुरातत्त्व विभाग नागपूरअंतर्गत करण्यात येत आहे. मंदिरालगत पूर संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. यासाठी खोदकाम सुरू असताना देवदेवतांच्या ४ मूर्ती आढळून आल्यात. याठिकाणी मंदिराच्या बांधणीच्या वेळेस जो काळा पाषाण दगड वापरण्यात आला त्याच पद्धतीच्या काळ्या पाषाणावर कोरीव अशा मूर्ती आहेत. त्या ४ मूर्तींपैकी ३ मूर्ती बजरंगबली व १ मूर्ती राधाकृष्णांची आहे. लासूर हे गाव पूर्णा, चंद्रभागा, काटेपूर्णा नदीचा त्रिवेणी संगम असलेल्या सांगवामेळ गावापासून जवळच आहे. पूर्णा नदीच्या तिरावर वसलेले लासूर हे गाव आनंदेश्वर मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाते. अमरावती येथील आझाद हिंद मंडळाने यंदा आनंदेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारल्यामुळे लासूरचे मंदिर चर्चेत आहे. यादवकालीन राज्यामध्ये हेमाडपंथी धाटणीचे हे मंदिर बांधण्यात आल्याचा इतिहास आहे. मंदिरामध्ये देवदेवतांच्या मूर्ती व कोरीव हस्तकलेचा खास नमुना याठिकाणी पहावयास मिळतो. देशभरातून पर्यटक व लेण्याचे अभ्यासक याठिकाणी भेट देतात. श्रावणात याच ठिकाणी मोठी यात्रा भरते. पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनंतर या मंदिराची आणखी माहिती व इतिहास उजेडात येणार आहे. चार कोरीव मूर्ती आढळल्यायादवकालीन राज्यात जेव्हा मंदिराची बांधणी करण्यात आली, त्यावेळी हत्तीच्या साह्याने याठिकाणी दगड आणून कोरीव काम करण्यात आले होते. सध्या मंदिराचे जीर्णोद्धाराकरिता खोदकाम होत असताना ५ ते ७ फुटांवर या ४ मूर्ती तसेच काही कोरीव दगड आढळले. यापूर्वी ब्रिटिश राजवटीत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आले असल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.पुरातन विभागाच्या मजुरांनी केले खोदकामपुरातन विभागाच्यावतीने मंदिराचे जीर्णोद्धार सुरू आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला खोदकाम होत आहे. गावातील मजूर रमेश दाळे, लखन आठवले, रवी खंडारे, सत्यपाल आठवले, जगतपाल आठवले हे खोदकाम करीत असताना त्यांना प्राचीन कोरीव मूर्ती आढळल्या. आम्ही खोदकाम केले असता याठिकाणी ६ ते ७ फुटांवर देवदेवतांच्या कोरीव मूर्ती आढळल्या. यानंतर यासंदर्भाची माहिती गावातील सरपंच व पोलीस पाटलांना देण्यात आली व नंतर मूर्ती मंदिरात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.- रमेश डोळे, मजूर.मंदिरात प्राचीन मूर्ती सापडल्याचे मला गावकऱ्यांनी सांगितले. सोमवारी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना, तज्ज्ञांना व प्राचार्यांकडून या मूर्तींविषयी माहिती देण्यात येईल.- राहुल तायडे, तहसीलदार.