शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

अमृत अभियानात अमरावती, अचलपूरचा होणार विकास

By admin | Updated: October 16, 2015 00:44 IST

शहरात नागरी सुविधांची निर्मिती करण्यासाठी केंद्र पुरस्कृत अमृत योजनेची (अटल मिशन फॉर रेजुव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन)

केंद्राची योजना : गरिबांसाठी नागरी सुविधांची निर्मितीअमरावती : शहरात नागरी सुविधांची निर्मिती करण्यासाठी केंद्र पुरस्कृत अमृत योजनेची (अटल मिशन फॉर रेजुव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन) अंमलबजावणी करण्याचे आदेश मंगळवारी नगरविकास प्रशासनाने दिले आहेत. राज्यातील ४३ शहरांची निवड या मिशनसाठी करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिकेचा समावेश आहे. या शहरात पाणीपुरवठा, मल नि:सारण, नागरी परिवहन पुरविणे व शहरात गरिबांसाठी सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. शहरातील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणे यासाठी शासनाकडून नेहमीच प्राधान्य दिले जाते. शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलीत निकषानुसार पाणीपुरवठा करणे, शहरामध्ये मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, शहरातील परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करुन प्रदूषण कमी करणे, शहराच्या स्वच्छतेकरिता मलनि:सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्य जल वाहिनीची व्यवस्था करणे, शहरात मोकळी जागा, हरितक्षेत्र आदी सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाने अमृत अभियान राबविण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे उपसचिव सं.श. गोखले यांनी मंगळवारी दिले.यासाठी राज्य व जिल्हास्तर समिती गठित करण्याच्या सूचना शासनाने दिल्यात. यामध्ये शहराचा सेवास्तर अंतर, समता बांधणी, नागरी सुविधांची पूर्तता व वित्तीय नियोजन याविषयी स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अमृत अभियानात ही कामे होणारपाणीपुरवठा - पाणीपुरवठा वृध्दीबदल, जलशुध्दीकरण प्रक्रिया यंत्रणा, मिटरींग, जुन्या योजनांचे पुनपुज्जजीवीकरण, जलस्त्रोताचे पुनपुज्जजीवीकरण, भूजल पातळी वाढीचे उपक्रम, दुर्गम शहरे विशेष पाणीपुरवठा योजना.मलनिस्सारण - विकेंद्रित भुयारी गटार योजना, जुन्या मलनि:सारण योजनांचा वृध्दीबद्दल, मलप्रक्रिया केंद्रे, जुन्या मलनि:सारण योजनांचे व मलप्रक्रिया केंद्राचे पुनरुज्जीवन, पाण्याचा पुनर्वापरमलप्रक्रिया - मलप्रक्रिया व्यवस्थापन, गटारे व सेप्टिक टँक यांची यांत्रिक व जैविक व्यवस्था.पर्जन्य जलवाहिनी - पूरनिर्मूलनासाठी पर्जन्य जलवाहिनी बांधकाम.नागरी वहतूक - बसेसे, पदपथ, वॉकवेज, साईड वॉक, फ्रुट ओव्हर ब्रिज, नॉन मोटोराईज्ड ट्रान्सपोर्ट, बहुमजली वाहनतळ, बस रॅपीड ट्रांझिट सिस्टीम.