शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

३३४ दिवसांत अमरावतीकरांची उडवली चार कोटींची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

अमरावती शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या संपत्तीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत शहरात १३९ घरफोडी व ७९९ चोऱ्या झाल्या, तर १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत १५९ घरफोडी व ७९६ चोऱ्या झाल्या आहेत. त्याची तुलना केली असता, यंदा २० घरफोड्या व तीन चोरीच्या घटना वाढल्या.

ठळक मुद्दे७० लाखच रिकव्हर । १५९ घरफोडी, चोरीच्या ७९६ घटना

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या ११ महिन्यांतील ३३४ दिवसांमध्ये १५९ घरफोड्या व ७९६ चोऱ्या झाल्या आहेत. यामध्ये अमरावतीकरांची तब्बल चार कोटींची संपत्ती चोरांनी लंपास केली. पोलिसांनी अटक केलेल्या चोरांकडून केवळ ६९ लाख ९५ हजार ८७४ रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा घरफोडी व चोरीचे गुन्हे वाढले आहेत, तर गुन्ह्यांचा छडा लावण्याचे व संपत्ती जप्तीचे प्रमाण कमी असल्याचे पोलिसांच्या लेखाजोख्यावरून दिसून येत आहे.अमरावती शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या संपत्तीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत शहरात १३९ घरफोडी व ७९९ चोऱ्या झाल्या, तर १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत १५९ घरफोडी व ७९६ चोऱ्या झाल्या आहेत. त्याची तुलना केली असता, यंदा २० घरफोड्या व तीन चोरीच्या घटना वाढल्या. या दोन्ही वर्षांच्या आकडेवारीत मोठी तफावत नाही, मात्र, नागरिकांची कोट्यवधींची संपत्ती चोरून नेल्याचे दिसून येत आहे.नोव्हेंबर २०१८ पर्यंत घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये २ कोटी ८९ लाख ७९ हजार ७१८ रुपयांच्या संपत्तीपैकी पोलिसांनी ५० लाख ६८ हजार ५५९ रुपयांची संपत्ती जप्त केली. यंदा नोव्हेंबर २०१९ पर्यंत ४ कोटी १३ लाख १८ हजार ९०५ रुपयांच्या संपत्तीपैकी पोलिसांनी ६९ लाख ९५ हजार ८७४ रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. दोन्ही वर्षांत चोरट्यांनी चोरून नेलेली कोट्यवधीची संपत्ती जप्त करण्यात अमरावती शहर पोलिसांना यश मिळाले नसल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.गेल्या वर्षांच्या तुलनेत घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात थोडीशी वाढ झाली आहे. या गुन्हेगारांची टोळी निष्पन्न करण्याचे प्रयत्न सुरु आहे. दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात आरोपींचे अटकसत्रही सुरु आहे.- संजयकुमार बाविस्करपोलीस आयुक्तजबरी चोरी झाली कमी२०१८ मध्ये नोव्हेंबरपर्यंत जबरी चोरीच्या ७३ घटना घडल्या. लुटमार करणाऱ्यांनी तब्बल ३२ लाखांची संपत्ती जबरीने चोरून नेली होती. पोलिसांनी सहा गुन्हे उघड करून आरोपींकडून ९ लाख ५८ हजार रुपयांची संपत्ती जप्त केली. २०१९ मध्ये ५८ घटना घडल्या असून, २२ लाख ४० हजारांची संपत्ती लुटली. पोलिसांनी एका गुन्ह्याचा छडा लावून ५ लाख ४० हजारांची संपत्ती जप्त केली. २०१८ मधील गुन्ह्याच्या तुलनेत यंदा १५ गुन्हे कमी घडले आहेत.दुचाकीचोरीचे ३३७ गुन्हेशहरात दुचाकीचोरांनी धुमाकूळ घातला आहे. नोव्हेंबर २०१९ पर्यंत चोरांनी शहरातील ३३७ दुचाकी चोरून नेल्या आहेत. यापैकी केवळ ६७ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले. २०१८ मध्ये २७५ गुन्ह्यांपैकी ५८ गुन्हे पोलिसांनी उघड केले होते.दरोड्याचे गुन्हे वाढलेनोव्हेंबर २०१८ पर्यंत शहरात दोन दरोडे पडले होते, तर यंदा दरोड्याच्या पाच घटना घडल्या. याशिवात दरोड्याच्या प्रयत्नाचे २०१८ मध्ये तीन गुन्हे घडले. २०१९ मध्ये एक गुन्हा घडला आहे.मोबाइल चोरीचे गुन्हे घटले२०१८ तील ११ महिन्यांत शहरात तब्बल १०६ मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांच्या नोंदी झाल्या, तर २०१९ मधील ११ महिन्यात केवळ ४६ गुन्हे नोंदविले गेले. दोन्ही वर्षांची तुलना केली असता, यंदा ६० गुन्हे कमी झाले आहेत.११ महिन्यांत सहा चेनस्नॅचिंगनोव्हेंबर २०१८ पर्यंत शहरात २१ मंगळसूत्र हिसकावून नेल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा या गुन्ह्यांत प्रचंड घट झाली असल्याची आकडेवारी पुढे आली.

टॅग्स :Thiefचोर