शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरावर झेडपी देणार आता आदर्श कर्मचारी पुरस्कार!

By जितेंद्र दखने | Updated: December 9, 2024 21:22 IST

सीईओंची संकल्पना : दरवर्षी ३० कर्मचाऱ्यांची होणार सन्मान

अमरावती : जिल्हा परिषद आदर्श शिक्षक, आदर्श ग्रामसेवक पुरस्काराच्या धर्तीवर आता अमरावती जिल्हा परिषदे मार्फत आदर्श कर्मचारी पुरस्कार देण्याचा संकल्पना मुख्यकार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी मांडली आहे. यानुसार दरवर्षी १४ पंचायत समितीमधून प्रत्येक एक आणि मुख्यालयातील विविध विभागातून प्रत्येकी एका अशा ३० कर्मचाऱ्यांना झेडपी मारफत आदर्श कर्मचारी पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यंदापासून ही संकल्पना अंमलात येणार असून येत्या १६ डिसेंबरला पहिला पुरस्कार सोहळा जिल्हा परिषदे मार्फत पार पडणार आहे. जिल्हा परिषदेत सीईओ संजिता महापात्र याच्या संकल्पनेत पहिल्यांदाच राज्यात अमरावती जिल्हा परिषदेने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ३० कर्मचाऱ्यांची निवड करून यापुढे दरवर्षी हा पुरस्कार संविधानदिनी २६ नोव्हेंबरला बहाला केला जाणार आहे. या पुरस्कारासाठी जीएडीकडे अर्ज प्राप्त झाले आहे. शिक्षक,ग्रामसेवक व गुणवंत कर्मचाऱ्यांना शासनाकडून दरवर्षी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर सुद्धा आदर्श पुरस्काराने गौरविले जाते. मात्र प्रशासनात स्थानिक पातळीवर उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची कौतुकाची थाप पडत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर या कर्मचाऱ्याचा गौरव करून प्रोत्साहन देण्याचे दृष्ट्रीने झेडपी सीईओ संजीता महापात्र यांनी ही नवी संकल्पना मांडून त्याची अंमलबजावणी यंदापासूनच सुरू केली आहे. 

त्यानुसार जिल्हास्तरावर यावर्षीपासूनच ३० आदर्श कर्मचाऱ्यांना पुरस्कारासाठी निवडले जाणार आहे. यासाठी सात सदस्यीस समितीचे गठण केले आहे. या समितीचे प्रमुख स्वत: सीईओ राहणार असुन अतिरिक्त सीईओ हे उपाध्यक्ष तर सदस्य म्हणुन मुख्य लेखा व वित्त अधिकारी, बांधकामचे कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला बाल कल्याण विभाग व सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ यांचा समावेश केला आहे. आदर्श कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविले जाणार आहे.

याप्रमाणे निवडले जाणार पुरस्कारार्थीजिल्हा परिषद मार्फत दरवर्षी ३० कर्मचाऱ्यांची पुरस्काराासाठी निवड केली जाणार आहे. यामध्ये १४ पंचायत समितीस्तरावर १४ कर्मचारी, मुख्यालयातील जीएडीमधून ३ कर्मचारी, बांधकामचे २, आरोग्य ३, महिला बालकल्याण १, वित्त १,कृषी व पशुसंवर्धन मधून प्रत्येकी १, ग्रामिण पाणी पुरवठा १, सिंचन १ व शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याची हा पुरस्कार दिला जाणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती