शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
2
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
3
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
4
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
5
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
6
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
7
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
8
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
9
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
10
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
11
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
12
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
13
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
14
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
15
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
16
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
17
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
18
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
19
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
20
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी

‘त्या’ पाेलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कोर्ट अवमानना याचिका मंजूर का करण्यात येऊ नये, न्यायालयाचा सवाल

By गणेश वासनिक | Updated: May 19, 2024 22:04 IST

Amravati News: परप्रांतातील चाेरीच्या ट्रकच्या बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्रीप्रकरणी अमरावती येथील आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना नवी मुंबई पोलिसांनी ३० एप्रिल रोजी गुन्हे दाखल करून अटक केली होती. याप्रकरणी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने १७ मे रोजी सात पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्याविरुद्धची कोर्ट अवमाननाची याचिका मंजूर का करण्यात येऊ नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

- गणेश वासनिकअमरावती - परप्रांतातील चाेरीच्या ट्रकच्या बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्रीप्रकरणी अमरावती येथील आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना नवी मुंबई पोलिसांनी ३० एप्रिल रोजी गुन्हे दाखल करून अटक केली होती. याप्रकरणी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने १७ मे रोजी सात पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्याविरुद्धची कोर्ट अवमाननाची याचिका मंजूर का करण्यात येऊ नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. अवमाननाप्रकरणी २८ जून रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अमरावती येथील आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांवर झालेल्या या अन्यायाबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने कंबर कसली असून, पोलिस विभागाच्या दडपशाहीविरुद्ध मोर्चा उघडला आहे. पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा अधिकार नसताना अधिकार क्षेत्राबाहेरील प्रकरणाच्या तपास करून आरटीओच्या अधिकाऱ्यांना अटक केल्याप्रकरणी दोषी पोलिस अधिकारी व या गैरकृत्याला समर्थन देणारे वरिष्ठ अधिकारी हे भारतीय दंड विधानच्या कलम १६६, २२०, ४०९, १२० (ब) आणि ३४ नुसार कारवाईस पात्र ठरतात, अशी कायद्यात तरतूद आहे. आरटीओच्या महिला अधिकाऱ्यांची सर्वाेच्च न्यायालयात धावनवी मुंबई पोलिसांनी अटक करतेवेळी अमरावती येथील आरटीओच्या महिला अधिकाऱ्यांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाले. याप्रकरणी नवी मुंबई पोलिस उपायुक्त अमित काळे यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध या महिला अधिकाऱ्यांनी १७ मे रोजी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १८२४३/ २०२४ अन्वये क्रिमिनल याचिका दाखल करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सर्वाेच्च न्यायालय अथवा नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही. किंबहुना नोटीसआल्यास पोलिस विभागाकडून रीतसर उत्तर दिले जाईल.- अमित काळे, उपायुक्त, नवी मुंबई पोलिस

टॅग्स :AmravatiअमरावतीCourtन्यायालय