शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: जिल्हा स्त्री रुग्णालयाची नवी इमारत कधी कार्यान्वित होणार? लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By उज्वल भालेकर | Updated: July 3, 2024 19:07 IST

Amravati News: अमरावती - जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरिन) येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु ही इमारत काही किरकाेळ कामांमुळे अजूनही रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. येथील २०० बेडच्या अनुषंगाने आकृतिबंधाचा प्रस्तावदेखील मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असून, तो प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे.

- उज्वल भालेकर  अमरावती - जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरिन) येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु ही इमारत काही किरकाेळ कामांमुळे अजूनही रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. येथील २०० बेडच्या अनुषंगाने आकृतिबंधाचा प्रस्तावदेखील मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असून, तो प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे; परंतु याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे राज्याच्या सुरू असलेल्या अधिवेशनात तरी लोकप्रतिनिधी इमारत कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डफरिन रुग्णालयात रोज जिल्हाभरातील शेकडो गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल होत असतात. जिल्ह्यातील हे एकमेव रेफर सेंटरही आहे. डफरिनची जुनी इमारत इंग्रजकालीन असून, रुग्णसंख्येच्या तुलनेत सदर इमारतीमधील सोयीसुविधा या अपुऱ्या आहेत. या ठिकाणी दोनशे खाटांची सुविधा असून, प्रत्यक्षात २५० ते ३०० च्या आसपास गर्भवती महिला उपचारासाठी दाखल असतात. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी, तसेच महिलांना योग्य सुविधा मिळावी, याकरिता या ठिकाणी २०० खाटांचे अतिरिक्त रुग्णालय या परिसरात उभारण्यात आले आहे. जवळपास ४५ कोटी रुपयांच्या खर्चातून या रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी २०१३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१८ मध्ये वर्कऑर्डर काढण्यात आली.

सध्या इमारतीचे बांधकाम हे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, काही किरकोळ फर्निचरचे काम बाकी आहे. २६ एप्रिल २०२२ मध्ये डफरिनच्या जुन्या इमारतीत झालेल्या व्हेंटिलेटर स्फोटानंतर लवकरच नवी इमारत कार्यान्वित करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; परंतु या घटनेनंतर दीड वर्षाचा कालावधी उलटूनही नवीन इमारत कार्यान्वित झालेली नाही. मंजुरीसाठी पाठविलेला २०० बेडचा आकृतिबंधाचा प्रस्तावदेखील मंजूर झालेला नसून, तो मंत्रालयात पडून आहे. सुरू असलेल्या राज्याच्या अधिवेशनात जिल्ह्यातील आमदारांनी यासंदर्भात पाठपुरावा करून तातडीने जिल्ह्यातील महिला व बालकांसाठी नवीन इमारत कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल