शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

अमरावतीमध्ये विद्यापीठ युवा महोत्सवाचा थाटात प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 8:39 PM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला सोमवारी थाटात प्रारंभ झाला.

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला सोमवारी थाटात प्रारंभ झाला. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेने यजमानपद स्वीकारलेल्या येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात चार दिवस चालणाऱ्या या युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

युवा महोत्सवात लोकनृत्य, समूहगान, एकांकिका, कोलाज, वाद्यसंगीत, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धेची मांदियाळी असणार आहे. त्याकरिता पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. यावेळी  जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले की, देशाच्या जडणघडणीत युवकांचे सामाजिक उत्तरदायित्व महत्त्वाचे असून, युवकांनी समाजनिर्मितीसाठी पुढे येऊन कर्तव्य पार पाडावे. युवा महोत्सव हे युवकांच्या कला, गुणांना न्याय देणारे हक्काचे व्यासपीठ आहे. विद्यार्थी दशेत युवा महोत्सवात सहभागी होणाºया प्रत्येक युवकांना ही आठवण चिरकाल स्मरण राहील.

युवकांची ऊर्जा सकारात्मक वळणे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जीवनात ध्येय गाठण्यासाठी शॉॅर्टकट न शोधता परिश्रम, जिद्द, कष्ट करण्याची आकांक्षा बाळगा. तेव्हा यश तुम्हाला मिळेल, असे नवाल म्हणाले. तसेच पौर्णिमा दिवसे आणि त्यांच्या चमुने सादर केलेल्या विद्यापीठ गीताने युवा महोत्सवाची सुरूवात झाली. पाहुण्यांचे स्वागत ग्रामगीता देऊन करण्यात आले. गतवर्षीच्या उत्कृष्ट युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत किशोर देशमुख यांचा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक सुधीर मोहोड, संचालन मंजूषा वाठ, आभार प्रदर्शन विनोद गावंडे यांनी केले.

युवा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी कुलगुरू राजेश जयपूरकर याच्यासह प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप खेडकर, प्रफुल्ल गवई, दिनेश निचित, कुलसचिव तुषार देशमुख, व्हीएमव्ही संस्थेचे संचालक वसंत हेलावी (रेड्डी), विद्यार्थी विकास संचालक दिनेश सातंगे, सिनेट सदस्य मनीष गवई, रासेयो संचालक राजेश बुरंगे, युवा महोत्सव समन्वयक सुधीर मोहोड, विनोद गावंडे, राजीव बोरकर, कमल भोंडे, जयश्री वैष्णव, रेखा मग्गीरवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती