शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन; कॅन्सरशी झुंज संपली

By गणेश वासनिक | Updated: January 28, 2023 09:55 IST

कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे शनिवारी पहाटे पुणे येथे निधन झाले. ते वर्षभरापासून कॅन्सर या आजाराशी लढा देत होते.

कुलगुरू म्हणून डॉ. मालखेडे यांनी   ११ सप्टेंबर २०२१ रोजी अमरावती विद्यापीठाची सूत्रे सांभाळली होती. डॉ. दिलीप मालखेडे पुणे येथील शासकीय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होते. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली होती.

डॉ. मालखेडे हे  दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत होते. मालखेडे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेतून पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे  (एमई) शिक्षण घेतले. मुंबई आयआयटी मधून त्यांनी संशोधन कार्य करीत पीएचडी प्राप्त केली होती. 

कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठे यांच्यासोबत करार केला होता. नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावे याकरिता त्यांनी अमरावती विद्यापीठात सर्व विषयांसाठी क्रेडिट बेस्ट चॉईस सिस्टीम सुद्धा लागू केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा आप्त परिवार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती