शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आशिया खंडात नावलौकिकासाठी अमरावती विद्यापीठाची धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 20:01 IST

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने बृहत आराखडा तयार केला असून, आशिया खंडात नावलौकिक मिळण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे.

 अमरावती - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने बृहत आराखडा तयार केला असून, आशिया खंडात नावलौकिक मिळण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. राष्ट्रीय क्रमवारीत विद्यापीठ कसे येईल, याबाबत विद्यार्थी केंद्रित सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची सभा मंगळवारी पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य एफ.सी. रघुवंशी, दिनेश सूर्यवंशी, स्मीता देशमुख, ए.बी.मराठे, मनीषा काळे, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक जयंत वडते आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार करताना नव्या महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला. शासनाचे मार्गदर्शक तत्त्वे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यापूर्वी विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार करताना पारंपरिक, वैचारिक महाविद्यालयांची स्थापना व्हायची. मात्र, आता ‘रिझल्ट ओरिएन्टेड’ महाविद्यालयांची स्थापन केली जाईल. ‘अर्न अ‍ॅन्ड लर्न’ ही तत्त्वे स्वीकारली आहे. नवीन संस्था अथवा महाविद्यालयांना मान्यता प्रदान करताना उद्योग, रोजगार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन, उद्योगधंद्यांना पूरक अभ्यासक्रम, कौशल्य विकास, पारंपरिक भारतीय खेळांचे जतन, सांस्कृतिक वारसा, विद्यार्थी कल्याण योजना, ग्लोबलायझेशन, समाजकारण ते राजकारण, उद्योगासाठी महाविद्यालये, रोजगारभिमुख अभ्यासक्रम आदी बाबींना स्थान देण्यात आले आहे. मुलींच्या उच्च शिक्षणाची काळजी घेताना तालुकास्तरावर महाविद्यालयाची स्थापना, उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळ हे निश्चित केले जाणार आहे. मास्टर प्लॅनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधनाला प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक नोंद असलेला बृहतआराखडा तयार करण्यात आला आहे. ‘नॅक’च्या पुढे आता ‘एनआरएस’ क्रमवारीत नाव येण्यासाठी अमरावती विद्यापीठाने वाटचाल सुरू केली आहे.

पारंपरिक भारतीय खेळाचे केंद्र सुरू होणारसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पारंपरिक भारतीय खेळाचे केंद्र सुरू करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिल्याची माहिती दिनेश सूर्यवंशी यांनी दिली. युनोच्या ठरावानुसार पारंपरिक खेळाचे जतन करण्याचे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने अमरावती विद्यापीठात भारतीय खेळाचे स्वतंत्र केंद्र सुरू  होईल, असे सूर्यवंशी म्हणाले.

उद्योग, रोजगारभिमुख शिक्षण हे बृहतआराखड्याचा आत्मा आहे. सांस्कृतिक वारसाचे जतन, आंतरराष्ट्रीय स्तराचे संशोधन, शिका आणि कमवा, राष्ट्रीय स्तराचे अभ्यासक्रम आदी महत्त्वाच्या बाबीचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात आशिया खंडात अमरावती विद्यापीठाचे नाव गौरविले जाईल.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावतीnewsबातम्या