शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात नोकर भरती करणे बंद करा, आता हे चालणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा गुगल, मायक्रोसॉफ्टसह अमेरिकी कंपन्यांना इशारा
2
भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या, या वस्तू होणार स्वस्त, पाहा यादी
3
Rishabh Pant Injury Update : पंत विकेटमागे दिसणार नाही; पण गरज पडल्यास तो बॅटिंग करेल! BCCI नं दिली माहिती
4
“निवडणूक आयोगाने केलेली मतांची चोरी पकडली, १०० टक्के पुरावे...”; राहुल गांधी पुन्हा बरसले
5
वडील मौलवी, मुलगा पुजारी; कृष्णा बनून मंदिरात पूजा करायचा कासिम, लोकांना संशय आला अन्...
6
"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा
7
कंपनीला नुकसान, पण अध्यक्षांना 'बंपर' पगारवाढ! टाटा सन्सच्या N. चंद्रशेखरन यांचं पॅकेज पाहून डोळे विस्फारतील!
8
'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना
9
पाकिस्तानी पासपोर्टचा नंबर शेवटून चौथ्या नंबरवर; भारतासाठी आनंदाची बातमी
10
रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...
11
राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय! प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
12
IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार
13
“स्वागत, अभिनंदन करतो”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
14
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; उच्चांकी स्तरावरुन मोठ्या प्रमाणात घसरले दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत
15
धक्कादायक! पत्नीने पतीची जीभ तोडून खाल्ली; रक्तही प्यायली, ऐकून पोलिसही चक्रावले...
16
Shravan Somvar 2025: सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!
17
'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
18
IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर!
20
Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य

अमरावती विद्यापीठाला रिक्त पदांचे ग्रहण, ४७४ पैकी २५३ जागा रिक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:25 IST

 - गणेश वासनिक अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक-दोन नव्हे, तर चक्क २५३ पदे रिक्त आहेत. ही स्थिती असताना शासन परवानगीशिवाय पदभरती करू  नये, असे आदेश वित्त विभागाने निर्गमित केल्याने विद्यापीठाचा कारभार कसा चालवावा, असा पेच प्रशासनापुढे आहे.विद्यापीठात एकूण २८ विभाग आहेत. त्यापैकी २४ अनुदानित, तर चार विनाअनुदान तत्त्वावर सुरू ...

 - गणेश वासनिक 

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक-दोन नव्हे, तर चक्क २५३ पदे रिक्त आहेत. ही स्थिती असताना शासन परवानगीशिवाय पदभरती करू  नये, असे आदेश वित्त विभागाने निर्गमित केल्याने विद्यापीठाचा कारभार कसा चालवावा, असा पेच प्रशासनापुढे आहे.विद्यापीठात एकूण २८ विभाग आहेत. त्यापैकी २४ अनुदानित, तर चार विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहेत. त्यांच्या संचालनासाठी प्राध्यापकांच्या ३३, तर प्रथम ते चतुर्थ श्रेणीच्या २३४ रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. विद्यापीठात एकूण ४७४ पदे मंजूर असून, स्थापनेपासून याच मंजूर कर्मचारी आकडेवारीच्या भरवशावर कामकाज हाताळले जात आहे. दरम्यानच्या काळात अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. त्यामुळे प्रत्येक विभागात रिक्त पदांचा आलेख वाढत आहे. मनुष्यबळाअभावी काही विभागांचे कामकाज हे कंत्राटी पद्धतीने चालविले जात आहे. तथापि, काही विभागांचे काम हे अतिशय गोपनीय पद्धतीने करावे लागते. येथील कामांची जबाबदारी कंत्राटी कर्मचाºयांवर सोपविता येत नाही. प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत चालविणे हे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्यापुढील मोठे आव्हान आहे. माजी आमदार बी.टी. देशमुख यांनी १९९६-९७ साली विद्यापीठात नव्याने ४५० जागांवर भरतीचा प्रस्ताव अधिसभेत मंजूर करून तो शासनाने पाठविला होता. राज्य शासनाने भरतिप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. प्रत्येक अधिवेशनात विद्यापीठाच्या रिक्त पदांच्या भरतीचा विषय बीटींनी रेटून धरला. 

आकृतिबंधासाठी नव्याने प्रस्तावराज्य शासनाकडून विद्यापीठांचे नव्याने आकृतिबंध तयार केले जात आहेत. त्याअनुषंगाने अमरावती विद्यापीठाने प्रथम ते चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांच्या १३८ पदांच्या आकृतिबंधाचा प्रस्ताव पाठविला आहे.

टॅग्स :universityविद्यापीठeducationशैक्षणिक