शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुभत्या जनावरांना लागणार अमरावती 'टॉपर'चा 'टॅग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 18:56 IST

अमरावतीत जनावरांच्या ओळखीसाठी दुभत्या जनावरांनाही 'युनिक आयडेन्टी कोड' देण्यात येत असून त्यासाठी जनावरांना 'टॅग' लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

वैभव बाबरेकर/अमरावती, दि. 19 -प्रत्येक माणसाची ओळख पटण्यासाठी केंद्र शासनाने आधार नोंदणीचा उपक्रम राबविला. आता जनावरांच्या ओळखीसाठी दुभत्या जनावरांनाही 'युनिक आयडेन्टी कोड' देण्यात येत असून त्यासाठी जनावरांना 'टॅग' लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यात २४० जनावरांना आतापर्यंत 'टॅग' लावण्यात आले आहेत. यामध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.  

केंद्र शासनाने नागरिकांना आधार ओळखपत्र दिले त्यानुसार प्रत्येक नागरिकांच्या संपूर्ण माहितीचा डाटा तयार झाला आहे. त्याचप्रमाणे आता दुधाळ जनावरांपैकी गाय व म्हशी वर्गातील जनावरांनाही 'युनिक आयडेन्टी कोड' दिला जात आहे. जिल्ह्यात १६८ पशुवैद्यकीय चिकित्सालयातील प्रमुखांकडे गायी व म्हशींना 'टॅग' लावण्याचे काम सोपवण्यात आले असून टॅग लावलेल्या जनावरांची माहिती ऑनलाईन शासनाकडे पाठवावी लागत आहे. माहिती डाटा 'अपलोड' करण्यासाठी शासनाकडून पशुसंवर्धन विभागाला 'इनॉफ' साफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

शासनाकडून अमरावती जिल्ह्याला सद्यस्थितीत ५६ हजार टॅग उपलब्ध करून देण्यात आले असून जून महिन्यापासून पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत २४० जनावरांना टॅग लावले आहे. प्रत्येक जनावरांना टॅग लावलो जात असल्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील जनावरे दुभती आहेत व कोणत्या जनावरांची प्रजनन क्षमता सर्वाधिक आहे, ही माहिती शासनापर्यंत पोहोचणार आहे. त्यानुसार दुग्ध व्यवसायाची प्रगती निश्चित होण्याचे संकेत आहे. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे पशुधन विकास अधिकारी आर.एस.अलोने यांच्याकडे टॅगसंदर्भात जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कामाचा ताण वाढलाशासनाने नवा उपक्रम सुरू केला. मात्र, तेवढ्याच मनुष्यबळाला नियमित कामे करून 'टॅग' लावण्याचे काम करावे लागत आहे. जनावर पालकांना भेटून 'टॅग' लावण्याचे हे अतिरिक्त काम वाढल्यामुळे अधिकारी व कर्मचा-यांवर ताण वाढला आहे. टॅग लावल्यानंतर संपूर्ण माहिती ऑनलाइन 'अपलोड' करावी लागत आहे. मात्र, शासनाकडून डाटा एन्ट्री ऑपरेटर देण्यात आला नाही. जिल्हानिहाय आकडेवारीअमरावती - २४०औरंगाबाद- २३७अकोला- ४५सांगली - १७पुणे - ४ सातारा- ८रायगड-२रत्नागिरी-६माणसाच्या ओळखीसाठी आधार क्रमांक आहे. त्याचप्रमाणे दूध देणा-या जनावरांनाही युनिक आयडेन्टी कोड देण्यात येत आहे. त्यासाठी गाय व म्हशी वर्गातील जनावरांना टॅग लावून त्यांची संपूर्ण माहिती शासनाला पाठविली जात आहे. यात अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.  - मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त