शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत टी. राजा डिटेन, आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याच्या अटीवर सोडले

By गणेश वासनिक | Updated: August 27, 2024 20:39 IST

तेलंगणाचे आमदार : तिवसा पोलिसांनी रोखला ताफा, भाजप पदाधिकाऱ्यांसोबत तू-तू-मै-मै

अमरावती : परतवाडा येथील दहीहंडी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी येत असलेले तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तिवसा पोलिसांनी रोखले. सुमारे तासभर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये डिटेल करण्यात आले होते. कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आले. 

हैद्राबादच्या गोशामहल मतदारसंघाचे आमदार असलेले टी. राजा सिंह यांची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली आहेत. परतवाडा येथील कार्यक्रमात ते येणार असल्याचे अमरावती ग्रामीण पोलिसांना समजताच मंगळवारी दुपारी तिवसा येथील पेट्रोल पंपाजवळ त्यांचा ताफा रोखण्यात आला. यामुळे त्यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांची तू-तू-मै-मै झाली. त्यांचा ताफ्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनादेखील त्याबाबत माहिती देण्यात आली. 

सुमारे एक तास मोठा ड्रामा रंगल्यानंतर परतवाडा येथील दहीहंडी सोहळ्यादरम्यान कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे भाषणदेखील करणार नाही, असे टी. राजा यांनी पोलिसांना बंधपत्रावर लिहून दिले. त्यानंतरच आ. टी. राजा हे सायंकाळी ७ च्या सुमारास परतवाडाकडे रवाना झाले. 

दरम्यान, परतवाडा येथे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशान्वये तेथे अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.उपमुख्यमंत्र्याचा फोन; ठाकुरांचा इशारा आमदार टी. राजा सिंह यांना तिवसा येथे स्थानबद्ध करण्यात येणार होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती पोलिस अधीक्षकांना फोन करून त्यांना मार्ग मोकळा करून दिला. परंतु, जिल्ह्यातील वातावरणात दूषित झाल्यास किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी ही पोलिसांची राहील, असा इशारा काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिल्याची माहिती प्राप्त झाली आहेआमदार टी. राजा सिंह यांना तिवसा येथे डिटेन केले होते. प्रतिबंधात्मक कारवाई करून परतवाडा येथील कार्यक्रमासाठी सोडण्यात आले. - किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखाआयोजकांनी दडविली माहितीपरतवाडा येथे मंगळवारी सायंकाळी होणाऱ्या दहीहंडीला परतवाडा पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, दहीहंडी दरम्यान आमदार टी. राजा सिंह येणार आहेत, हे आयोजकांनी पोलिसांकडून दडवून ठेवल्याची माहिती यावेळी पुढे आली.

टॅग्स :Amravatiअमरावती