शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: जमावाकडून नागपुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात दगडफेक, पोलिसांनी फोडल्या अश्रूच्या नळकांड्या

By प्रदीप भाकरे | Updated: October 4, 2024 23:42 IST

Amravati News: उत्तर प्रदेशातील गाजियाबाद स्थित दासनादेवी मंदिराचे विश्वस्त यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये जमा झालेल्या संतप्त जमावाने दगडफेक केली.

- प्रदीप भाकरेअमरावती - उत्तर प्रदेशातील गाजियाबाद स्थित दासनादेवी मंदिराचे विश्वस्त यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये जमा झालेल्या संतप्त जमावाने दगडफेक केली. सुमारे पाचशे ते सातशे विशिष्ट धर्मीयांचा जमाव नागपूर गेट पोलीस स्टेशनवर चालून गेला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली असून  परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर अश्रुदुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. तूर्तास नागपुरी गेट पोलीस ठाणे परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती बदली आहे. यती नरसिंह नंद सरस्वती यांनी 29 सप्टेंबर रोजी गाजियाबाद येथे बोलत असताना विशिष्ट धर्मीयांविरुद्ध आक्षेपार्ह टिपणी केली होती. त्या टिपणीच्या आधारे त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करावा या मागणीसाठी एक मोठा जमाव नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये एकत्र आला.

ड्युटीवरील पोलीस अंमलदार घटना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच जमावातील काही लोक अचानक संतप्त झाले. त्यातील काहींनी पोलीस ठाण्याच्या बाहेर येत आवार व परिसरामध्ये मोठी दगडफेक केली. त्यामुळे क्षणात तणावाची स्थिती निर्माण झाली. नागपुरी गेटचे ठाणेदार हनुमंत उरलागुंडावार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र जमाव ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी जमावाच्या दिशेने अश्रुदुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान काही अज्ञात तत्त्वांनी परिसरामध्ये जाळपोळ केल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे. मात्र त्याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही.  संबंधित महंत व पोलीस स्टेशनमध्ये धुडबुज घालणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उशिरा रात्रीपर्यंत नागपुरी गेट ठाण्याच्या परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती होती.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी