शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Amravati: गोवंश तस्करीवर ग्रामीण पोलिसांची टाच; कारवाईचा चौकार १९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३६ गोवंशाची सुटका

By प्रदीप भाकरे | Updated: June 15, 2023 20:55 IST

Amravati:

- प्रदीप भाकरे अमरावती : कत्तलीसाठी होणाऱ्या गोवंश तस्करीला लगाम लावण्यासाठी नेमलेल्या फिक्स पॉईंटवरील पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुरुवारी एकाच दिवशी परतवाडा, चांदूररेल्वे, पथ्रोट व अचलपूर पोलिसांनी कारवाईचा हा चौकार मारला. एकूण ३६ गोवंशांना जीवदान दिले.

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गोवंश तस्करीला लगाम लावण्यासाठी जिल्ह्यातील दहा ठिकाणी फिक्स पाॅईंट लावले आहेत. गुरूवारपासूनच ते कार्यान्वित करण्यात आले. त्याअनुषंगाने चार पोलीस ठाण्याने गुरुवारी गोवंशाची अवैध वाहतूक रोखली. परतवाडा पोलिसांनी हॉटेल द्वारका येथे नाकाबंदी करून करजगाव मार्गे परतवाडाकडे गोवंश घेऊन जाणाऱ्या चार मालवाहू वाहनांना थांबविले. त्यात १९ गोवंश आढळून आले. त्या वाहनांसह एकूण ११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चांदूर रेल्वे पोलिसांनी सावंगी मग्रापूर येथे नाकाबंदी करून एका मालवाहू वाहनातून चार गोवंशांना जीवदान दिले. तेथून एकूण ५ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनचालक अ. साजिद शे. उमर (२७, रा. मनभा, जि. वाशिम) याच्याविरुद्ध चांदूर रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पथ्रोट पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान १३ गोवंशाना कत्तलीकरिता पायदळ घेऊन जाणाऱ्या चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १.५८ लाख रुपये किमतीचे गोवंश ताब्यात घेण्यात आले. पथ्रोट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तीनही कारवाईतील गोवंशांना देखभालीसाठी गोरक्षणात पाठविण्यात आले आहे.

अचलपुरात पकडले गोमांसअचलपूर पोलिसांनी १५ जून रोजी सय्यद मुस्ताक सय्यद मुनाफ कुरेशी याच्या ताब्यातून १२० किलो गोमांस व कुऱ्हाड जप्त केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती