शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Amravati: मराठा आरक्षणाच्या समर्थनात अमरावतीतही आंदोलन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा केला निषेध

By उज्वल भालेकर | Updated: October 31, 2023 19:07 IST

Amravati News: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषण करत आहेत. त्याच्या समर्थनामध्ये राज्यभरात मराठा समाज बांधव हे आंदोलन करत आहेत.

- उज्वल भालेकरअमरावती - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषण करत आहेत. त्याच्या समर्थनामध्ये राज्यभरात मराठा समाज बांधव हे आंदोलन करत आहेत. अशातच अमरावती शहरातही मंगळवारी राजकमल चौकात जरांगे-पाटील यांच्या समर्थनामध्ये तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन कुंड्यामध्ये बेशरमचे झाड लावून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो ठेवत राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला ४० दिवसांच्या अवधीनंतर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील सहा दिवसांपासून त्यांनी अन्नपाणी नाकारल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहेत. अशातच आता राज्यभरातील मराठा समाज जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये आंदोलन करत असून काही जिल्ह्यामध्ये हिंसक आंदोलनही झाल्याचे चित्र आहे. अशातच आता मराठा आरक्षण समर्थन समितीच्या वतीने राजकमल चौकात आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजातील अनेक बांधव हे हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहेत. आरक्षण नसल्यानेच मराठा समाज मागासलेला आहे. गरीब मराठा बांधवांमध्ये गुणवत्ता असून देखील आरक्षणाअभावी त्यांना निराशा पत्करावी लागते.

आज मराठा आरक्षणासाठी जे महाराष्ट्रात वलय सुरू आहे, ते अतिशय योग्य आहे. पण महाराष्ट्रातील सत्ता प्रस्थापित राजकीय मंडळी बेशरमच्या झाडाप्रमाणे खाली मान टाकून मराठ्यांच्या दुखण्यावर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठा बांधवांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या तसेच सरकारच्या वेळकाढू धोरणाचा यावेळी निषेध करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये नितीन देशमुख, रामेश्वर कापसे, प्रवीण वाकोडे, हर्षद ढोणे, प्रेम जवंजाळ, प्रफुल डोंगरे, भूषण डहाके, अजय गेडाम, संकेत नवले, रणजीत पाटीलसह इतर मराठा बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAmravatiअमरावती