शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अमरावती-परतवाडा-धारणी रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग; नितीन गडकरी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 16:52 IST

नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये उभारला जाणारा भारत डायनामिक्स कारखाना सुरू होणार अथवा नाही, याबाबतही गडकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अमरावती : अमरावती-परतवाडा-धारणीनंतर बैतुल असा हा राज्यमार्ग येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार प्रवीण पोटे हे मला दोनदा भेटून गेले. सतत त्यांचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे दिली. 

गडकरी हे एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, डॉ. अविनाश चौधरी यांनी अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भिजत घोंगडे असल्याची बाब त्यांच्या पुढ्यात ठेवली. तेव्हा गडकरींनी शासकीय मेडिकल कॉलेज स्थापनेबाबतचा प्रवास उलगडला. येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळाची कमतरता त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद निरवणे यांनी गडकरींकडे आराेग्य विभागात आवश्यक सोयीसुविधांची फाईल सादर केली. तथापि, अमरावती-परतवाडा, धारणी पुढे बैतुलपर्यंत हा राज्य मार्ग लवकरच राष्ट्रीय महामार्ग होईल, त्याअनुषंगाने निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, येथील नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये उभारला जाणारा भारत डायनामिक्स कारखाना सुरू होणार अथवा नाही, याबाबतही गडकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमरावती-यवतमाळ या राज्य मार्गाची अवस्था कधी सुधारणार, या प्रश्नावर गडकरी यांनी हा मार्ग राज्य सरकारच्या मालकीचा आहे, त्यामुळे या मार्गाची जबाबदारी राज्य सरकारकडे असेल, असे ते म्हणाले. यावेळी आमदार प्रवीण पोटे, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, डॉ. अविनाश चौधरी, दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर आदी उपस्थित होते.

म्हणून झाले नाही गडकरींच्या विमानांचे लॅन्डिंग

ना. नितीन गडकरी हे रविवारी अमरावती दौऱ्यावर येताना त्यांनी विमानाने येण्याचे नियोजन केले होते. मात्र, बेलाेरा विमानतळाची धावपट्टी ही हल्ली विमानांच्या लॅन्डिंगसाठी सध्या तयार नाही, बरीच कामे प्रलंबित असल्याची माहिती ना. गडकरींना प्रशासनाने दिली. त्यामुळे त्यांना नागपूर येथून बाय रोड यावे लागले, असे त्यांनी सांगितले. परंतु, गत काही दिवसांपूर्वी बेलोरा विमानतळासाठी ७५ कोटी रुपये मंजूर झाले होते, या निधीतून कामे सुरू झाली अथवा नाही? हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

नागपूर- अमरावती- नरखेड मेट्रो लवकरच

मेट्रोचा प्रवास हा बसपेक्षा स्वस्तात पडतो. त्यामुळे अमरावती-नागपूर- नरखेड असा नवा मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. संपूर्ण विदर्भात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम हाती घेतले जाईल, असे ना. गडकरी यांनी सांगितले. आठ डब्यांची मेट्रो असणार आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. प्रति ताशी १४० ते १५० किमी.चा मेट्रोचा वेग राहणार असून, यंदा डिसेंबरअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नितीन गडकरींच्या दौऱ्याबाबत विचारणा नाही : निवासी उपजिल्हाधिकारी

ना. नितीन गडकरी हे रविवारी विमानाने अमरावती येथे येणार असल्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विचारणा झाली नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू आहे. कोविड काळात ते बंद होते. सध्या धावपट्टीवर हेलिकॉप्टरही उतरू शकत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने आपातकालीन स्थितीत हेलिकॉप्टर बोलावल्यानंतर ते विमानतळावर उतरू शकत नाही, हे वास्तव आहे. जिल्हा प्रशासनाने मे महिन्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला धावपट्टी सुव्यवस्थित करण्याबाबतचे पत्र दिले होते, असे बिजवल म्हणाले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरीAmravatiअमरावती