शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

परवानाधारक ३४४ सावकार रडारवर, १३४ सावकारांवर एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 16:09 IST

पश्चिम विदर्भातील परवानाधारक ३४४ सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले.

 - गजानन मोहोड

अमरावती - पश्चिम विदर्भातील परवानाधारक ३४४ सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४ चे उल्लंघन झाल्याने सहकार आयुक्तांचे आदेशान्वये संबंधित ठाण्यात १३४ सावकारांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला. ही प्रक्रिया एक आठवड्यापासून सुरू आहे. या सर्व प्रकरणात संबंधित तालुक्यांचे सहायक निबंधक फिर्यादी आहेत. कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटपद्वारे कायद्याचे उल्लंघन करणाºया सावकारांचे परवाने नूतनिकरण करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याबाबत रीट याचिका सावकारग्रस्त शेतकरी समितीचे राज्याध्यक्ष अरूण इंगळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात दाखल केली. न्यायालयाने या याचिकेचे जनहीत याचिकेत रूपांतर केले. या विषयाचे अनुषंगाने सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधकास तत्काळ अहवाल मागितला होता. या पार्श्वभूमीवर परवानाधारक सावकारांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले.शासनाने  १० एप्रिल २०१४ रोजी शेतकºयांचे सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सावकारी कर्जमाफीची अंमलबजावणी करताना लेखापरीक्षकांनी सावकारांद्वारा सादर केलेल्या यादीची तपासणी केली. यामध्ये बºयाच सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेर कर्जवाटप केल्याचे निदर्शनास आले. हे अधिनियमाचे कलम ४१ (ख) व ४८ (क) नुसार गुन्हास पात्र असल्याने या सर्व सावकारांना सात दिवसांच्या आत खुलासा मागण्यात येवून आपले परवाने रद्द का करण्यात येवू नये, या विषयीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकाकडे पाठविण्यात आला व त्यानंतर परवानाधारक सावकाराविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्यात.

 सर्वाधिक सावकार अकोला जिल्ह्यातील विभागात एकूण १,१०५ परवानाधारक सावकार आहेत. यापैकी ३४४ सावकारांनी अधिनियमाचे उल्लंघन केले आहे. यामध्ये सर्वाधिक १५८ सावकार अकोला जिल्ह्यातील आहेत. यापैकी ८५ जनांवर गुन्हा नोंदविण्यात आला. अमरावती जिल्ह्यात १५० पैकी ४८, वाशिम जिल्ह्यात ५, बुलडाण्यात ३०, तर यवतमाळ जिल्ह्यात एका सावकाराने कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यंच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अशी आहे शिक्षेची तरतूदमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे नियम ३९ नुसार जी कोणी व्यक्ती वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारीचा व्यवसाय करीत असल्यास त्याला दोष सिद्ध झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या कारावासाची किंवा या दोन्ही शिक्षा करण्यात येतील व कलम ४८ (क) अन्वये शिक्षाप्राप्त अपराध हे दखलपात्र अपराध असतील, असे अधिनियमात नमूद आहे.

 या सावकारांचे परवाने होणार रद्द  जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित सहायक निबंधकांना एफआयआर दाखल झालेल्या सावकारांचे परवाना रद्द करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. यावर त्या एआरद्वारा संबंधित सावकारांना शोकॉज नोटीस बजावून त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर एआरच्या शिफारशीसह प्रस्ताव डीडीआरकडे येईल. त्यानंतर या सावकारांचे परवाने रद्द केले जाईल, अशी माहिती सहकार विभागाने दिली.

टॅग्स :Amravatiअमरावतीnewsबातम्या