शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती महापालिका निवडणूक, मतपेट्या उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:08 IST

Amravati : अमरावती महापालिकेसाठी गुरूवारी सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली. संपूर्ण २२ प्रभागात सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे १७.१ टक्के मतदान नोंदविले गेले आहे.

अमरावती : अमरावती महापालिकेसाठी गुरूवारी सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली. संपूर्ण २२ प्रभागात सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे १७.१ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. शहरातील जवाहर स्टेडियम प्रभागातील गर्ल्स हायस्कूल येथील ईव्हीएम मशीन २०मिनिटे बंद होते. यामुळे मतदारांना मतदान प्रक्रियेसाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. सकाळी ७.३० वाजता मतदार मोठ्या उत्साहात जिल्हा परिषदेच्या गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्रावर पोहोचले होते. 

दरम्यान, या मतदान केंद्रावरील खोली क्रमांक २ मध्ये एक मतदार मतदानासाठी आत गेला असता, ईव्हीएम सुरू होत नव्हते. मतदान प्रक्रिया होत नसल्याने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची काही वेळ तारांबळ उडाली. दरम्यान २० मिनिटानंतर ईव्हीएम मधील तांत्रिक अडचण सोडविण्यात मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना यश आले. तर, वडाळी येथील शाळा क्रमांक १४ या ठिकाणी मतदानासाठी आलेल्या मतदारांना ईव्हीएमवरील चार क्रमांकाचं बटन दबत नसल्याचे लक्षात आले. यानंतर इतर पाच ते सहा  जणांनी ते बटन दाबून पाहिले. अशा स्थितीत अर्धा तास मतदान प्रक्रिया खोळंबली. तर, प्रभाग क्रमांक १८ राजापेठ संत कंवरराम या प्रभागातील द्वारकानाथ अरोरा विद्यालय या मतदानकेंद्रावरील सुमारे अर्ध्या तासापासून बंद होती.  त्यातील एक बटन आतमध्ये अडकून पडल्याचे समोर आले.

तर, काही मतदान केंद्रावर अ, ब, क व ड या प्रमाणे मतपेट्या न लावता तो क्रम उलटा लावल्याचा आरोप शिंदेसेनेचे नेते कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी केला. तर दुसरीकडे १५ जागा असलेल्या मुस्लिमबहुल क्षेत्रातील मतदानकेंद्रांवर लोकसभेप्रमाणेच मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Election: EVM glitches, reverse ballot order alleged, voting underway.

Web Summary : Amravati municipal elections faced EVM issues, delaying voting. Reverse ballot order was alleged. High voter turnout observed in Muslim-dominated areas.
टॅग्स :Amravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026VotingमतदानEVM Machineईव्हीएम मशीन