शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती महापालिका क्षेत्रात ड्रोनऐवजी ‘जीआयएस’ने मूल्यांकन मालमत्ता कराची मागणी वाढणार : आयुक्त आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 18:42 IST

अमरावती महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी ड्रोनऐवजी जीआयएस (जीआग्रॅफिकल इन्फर्मेशन सिस्टीम) प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. नागपूर स्थित ‘एमआरएससीए’ संस्थेकडून घेण्यात येणा-या नकाशांवर आधारित घरनिहाय प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे.

अमरावती, दि. 31 - महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी ड्रोनऐवजी जीआयएस (जीआग्रॅफिकल इन्फर्मेशन सिस्टीम) प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. नागपूर स्थित ‘एमआरएससीए’ संस्थेकडून घेण्यात येणा-या नकाशांवर आधारित घरनिहाय प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण आणि पुनकरनिर्धारणाअंती महापालिकेच्या मालमत्ता कराची मागणी १०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.मागील १० वर्षांपासून शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण व करनिर्धारण न झाल्याने मालमत्ता कराची मागणी ३० कोटींच्या आसपास थांबली आहे. त्यात वाढ करण्यासाठी व कराच्या अखत्यारित नसलेल्या मालमत्तांवर कर बसवण्यासाठी यंदा निविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यात ८.५० कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेल्या कंपनीची निवडसुद्धा करण्यात आली. मात्र प्रकल्प किमतीवर आक्षेप घेऊन आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश दिले. महापालिकेने लोयेस्ट वन ठरविलेली कंपनी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणार होती. तसे त्या कंपनीने टेंडर डाक्युमेंटमध्ये स्पष्टही केले होते. तथापि १२ जूनच्या शासन निर्णयान्वये त्या कंपनीला आता ड्रोनऐवजी जीआयएस प्रणाली आधारित सर्वेक्षण व करनिर्धारण करावे लागणार आहे. राज्यातील सर्व ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायत व जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करावे, असा १२ जूनचा शासन निर्णय आहे. त्याअनुषंगाने अमरावती महापालिका हद्दीत आता ड्रोनऐवजी जीआयएस आधारित सर्वेक्षण होईल. त्यामुळे पैशाचीही बचत होणार आहे.अशी होईल अंमलबजावणी‘क’ व ‘ड’ वर्ग महापालिकांनी त्यांच्या क्षेत्राचे जीआयएस प्रणालीवर आधारित नकाशे ‘एमआरएससीए’ नागपूरकडून घ्यावेत. त्यावर संस्करण करून नकाशावर आधारित सर्वेक्षण करण्यात येईल. सर्वेक्षणाअंती डाटाबेसचे संकलन करून वेब बेस्ड ऑनलाईन प्रणाली अवलंबवावी व अ‍ॅप विकसित करण्याचे निर्देश महापालिकांना देण्यात आले आहेत.