लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हवामानात सातत्याने होणारा बदल आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानतेच्या समस्यांनी विमानसेवेला फटका बसत आहे. त्यामुळे अलायन्स एअर कंपनीने अमरावती विमानतळाहून सुरू असलेले मुंबई-अमरावती-मुंबई हे एटीआर-७२ आसनी विमान आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार आहे. सोमवार, शुक्रवार असे दोन दिवस प्रवाशांना मुंबई ये-जा करता येणार असून, अमरावती विमानतळावरून मुंबईच्या दिशेने दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी झेपावेल, असे नवे वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे यापूर्वी १ ते १५ डिसेंबर यादरम्यान अमरावती-मुंबई विमानसेवा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता.
आता अलायन्स एअर कंपनीने वेळेत बदल आणि आठवड्यातून दोनच दिवस विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईहून अमरावती विमानतळावर विमान दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. वातावरणात बदलामुळेच विमान सेवेच्या वेळेत बदल करण्यात आल्याची बाबदेखील स्पष्ट करण्यात आली आहे.
- अमरावती टेकऑफ : दुपारी २ वाजून १५ मिनिटे
- मुंबईहून टेकऑफ : दुपारी १२. ५ मिनिटे
- मुंबई लैंडिंग : दुपारी ४ वाजता
- अमरावती लॅडिंग : दुपारी १.५० वा.
"हवामानात सातत्याने होणारा बदल हा विमानसेवेला अडसर ठरत आहे. त्यातही दाट धुक्यामुळे दृश्यमानता ही मोठी समस्या ठरत आहे. अमरावतीकर प्रवाशांनी काही काळ होणारा त्रास सहन करून अलायन्स एअर कंपनीला सहकार्य करावे. आता आठवड्यातून सोमवार, शुक्रवार असे दोन दिवस अमरावती-मुंबई सेवा सुरू असेल."- राजकुमार पटेल, प्रबंधक अमरावती विमानतळ
Web Summary : Due to weather and fog, the Amravati-Mumbai flight service will operate only twice a week, on Mondays and Fridays. The schedule has also been revised, with departures from Amravati at 2:15 PM. Airport officials request cooperation during this period of disruption.
Web Summary : मौसम और कोहरे के कारण अमरावती-मुंबई विमान सेवा अब सप्ताह में केवल दो बार, सोमवार और शुक्रवार को चलेगी। समय सारणी भी बदल दी गई है, अमरावती से प्रस्थान दोपहर 2:15 बजे होगा। हवाई अड्डा अधिकारियों ने इस व्यवधान के दौरान सहयोग का अनुरोध किया है।