शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: २१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस, १३ तास १३ मिनिटे; दिवस मोठा अन् रात्र राहणार छोटी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 18, 2023 16:41 IST

Longest day of the year: पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जूनला १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस ठरणार आहे.

- गजानन मोहोडअमरावती : पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जूनला १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होत असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.

पृथ्वीचे अक्षवृत्त साडेतेवीस डिग्रीच्या झुकाव्याने ११ हजार किमी प्रति तासाच्या गतीने पश्चिमेकडे पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून १,०५,००० किमी प्रति तासाच्या वेगाने सुमारे ८९.४० कोटी किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातला जसा २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो, त्याप्रमाणे २२ डिसेंबर हा वर्षातला सर्वात लहान दिवस असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायन सुरू होत असते.

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी जास्त होत आहे. सन २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामी झाली होती. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घड्याळामध्ये लिप सेकंद ॲडजस्ट करावा लागतो, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, हौशी खगोल अभ्यासक यांनी दिली. खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी २१ जून या उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Natureनिसर्गEarthपृथ्वीAmravatiअमरावती