शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियातून अमरावतीच्या विधी महाविद्यालयाची वेबसाईट 'हॅक'! अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 20:47 IST

स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’ केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या ४३(अ), ६६(सी) अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सायबर सेलचे पोलीस करीत आहे.

अमरावती, दि. 28 -  स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’ केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या ४३(अ), ६६(सी) अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सायबर सेलचे पोलीस करीत आहे. सौदी अरेबियातील लोगो झळकत असल्याने हॅकर्स सौदीतील असावे, असा कयास लावला जात आहे. विधी महाविद्यालयाची ६६६.१िस्रूि’.ङ्म१ॅ ही वेबसाईट ‘हॅक’ झाली आहे. गाडगेनगर पोलिसांनी पंचनामा करून तपासकार्य सुरु केले आहे. या वेबसाईटच्या ‘सर्व्हर’ची देखभाल कॉटन मार्केट स्थित ‘डॉट कॉम इन्फोटेक प्रा.ली.’कडे आहे. त्यांच्या सर्व्हरमधून साईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आहे. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यामुळे साईट हॅक घाल्याचे लक्षात आले. 

महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’ झाली. यासंबंधाने पोलीस तक्रार नोंदविण्यात आली. - पी.आर.मालवीय, प्राचार्य डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती 

विधी महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’झाली. आम्ही वेबसाईटला सुरक्षा दिली होती. मात्र, तरीसुद्धा हॅकर्स यशस्वी झालेत. हॅकर्सनी वेबसाईटच्या होमपेजवर लोगो टाकला असून तो सौदी अरेबियामधील असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते.- पंकज बेलसरे, कर्मचारी, डॉट कॉम प्रा.लि.विधी महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’ झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून सायबर सेलला माहिती दिली. - कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे

टॅग्स :Crimeगुन्हा