शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Amravati: अपूर्ण घरकुले, १४ एचओंडीची स्पॉट व्हिजीट, २८ ग्रामपंचायतीमधील गावात पडताळणी

By जितेंद्र दखने | Updated: May 20, 2024 22:11 IST

Amravati News: शासनाने घरकुल योजनेच्या माध्यमातून मंजूर घरकुल लाभार्थ्याना योजनेचा लाभ देवूनही ग्रामीण भागात घरकुलाची पेंडन्सी मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली घरकुलाची कामे तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी कडक पावले उचलत आपल्या अधिनस्त असलेल्या १४ विभागाच्या प्रमुखांना या ठिकाणी स्पॉट व्हिजीट करण्याचे निर्देश दिले होते.

-जितेंद्र दखने  अमरावती  - शासनाने घरकुल योजनेच्या माध्यमातून मंजूर घरकुल लाभार्थ्याना योजनेचा लाभ देवूनही ग्रामीण भागात घरकुलाची पेंडन्सी मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली घरकुलाची कामे तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी कडक पावले उचलत आपल्या अधिनस्त असलेल्या १४ विभागाच्या प्रमुखांना या ठिकाणी स्पॉट व्हिजीट करण्याचे निर्देश दिले होते. या भेटीदरम्यान प्रत्यक्ष लाभार्थ्याशी भेटून बंद असलेले घरकुलाचे कामे तातडीने सुरू करण्यासाठी प्रवृत्त करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या विभाग प्रमुखांनी २८ ग्रामपंचायतीमधील विविध गावांत स्पॉट व्हिजीट करत घरकुलाचे कामाची पाहणी केलेली आहे.

जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी नंतर लाभार्थ्याना चार टप्यात घरकुलाचा निधी दिल्या जातो. केंद्र पुरस्कृत आवास योजनेंतर्गत सन २०१६ ते २०२२ या कालावधीत मंजूर केलेल्या घरकुलाचे लाभार्थ्याना पहिला हप्ता वितरीत केला. मात्र, घरकुल बांधकामास सुरुवात न केल्याने दुसरा व तिसरा हप्ता वितरीत केला नाही. घरकुल बांधकामात  जिल्हा राज्यस्तरावर माघारल्याने शासनाने याची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायती प्रमाणे  एकूण २८ ग्रामपंचायतींमध्ये अर्धवट घरांच्या स्पॉट व्हिजीट साठी निवडले होते. यासाठी झेडपीच्या १४ खातेप्रमुखांना जबाबदारी सोपविली होती. सीईओंनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे या अधिकारी मागील आठवडयातच २८ ग्रामपंचायतीत स्पॉट व्हिजीट केली आहे. या दरम्यान, येथील पहिल्या हप्त्यानंतर घरकुल न बांधण्याचे कारण तसेच संबंधित लाभार्थ्याशी अडचणी काय यावर प्रत्यक्ष संवाद साधून याची माहिती जाणून घेतली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या या भेटीचा अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर केला आहे.यावर आता पुढील कारवाईबाबत दिशा ठरणार आहे. या ग्रामपंचायतींचा दिल्या भेटीभातकुली तालुक्यातील पूर्णानगर, खारतळेगाव, धामणगाव रेल्वे मधील मंगरुळ दस्तगीर, विरुळ राधे, अमरावती तालुक्यातील वलगाव, यावली, वरूड तालुक्यातील मांगरोळी, जरूड, अचलपूर मधील शिंदी बु., पथ्रोट, धारणीतील हरिसाल, रंगुबेली, चिखलदरातील रायपूर, चिखली, अंजनगाव सुर्जी मधील चौसाळा, कापुसतळणी, नांदगाव खंडेश्वरमधील खानापूर, दाभा, चांदूरबाजारमधील विश्रोळी, सोनोरी, चांदूर रेल्वेमधील घुईखेड, राजुरा, मोशातील अंबाडा, नरपिंगळाई, तिवसामधील शिरजगाव मोझरी, तळेगाव दशासर.

टॅग्स :Amravatiअमरावती