शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

पाणी पिताय की रोगजंतू? १७६ गावांतील पाणी जोखमीचे; आरोग्य विभागाचा अहवाल

By जितेंद्र दखने | Updated: July 10, 2023 17:54 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी सर्वेक्षणात जिल्ह्यातील ६३७ ग्रामपंचायतीमधील ६१५२ जलस्त्रोतांचे नमूने आरोग्य विभागाकडून तपासण्यात आले.

अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी सर्वेक्षणात जिल्ह्यातील ६३७ ग्रामपंचायतीमधील ६१५२ जलस्त्रोतांचे नमूने आरोग्य विभागाकडून तपासण्यात आले. यापैकी तीव्र जोखीम असलेला एक जलस्त्रोत अचलपूर तालुक्यात आढळून आला आहे. याशिवाय मध्यम जोखीमीचे १७६ आणि आणि सौम्य जोखीमचे ६५६ स्त्रोत आढळून आले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर पाण्याच्या स्रोतांची तपासणी केली जाते. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्याची गुणवत्ता पाहून ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे व लाल कार्ड दिले जाते. 

ज्या गावातील पाणी स्वच्छ आहे त्या गावांना हिरवे कार्ड दिले जाते. ज्या गावांतील पाणी दूषित झाले आहे. त्यापासून साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशा गावांना पिवळे कार्ड दिले जाते. ज्या गावातील पाणी पिण्यास अयोग्य आहे, अशा ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते.जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ८३७ ग्रामपंचायतींमधील ६ हजार१५२ पाण्याच्या स्रोतांची तपासणी केली. जिल्हा प्रयोगशाळेतून हे पाण्याचे नमुने तपासून घेतले जातात. यामध्ये ६५६ गावांमधील पाणी स्वच्छ तर १७६ गावांमधील पाणी सौम्य जोखीमीचे आढळून आले आहे. एप्रिल महिन्यात तपासण्यात आलेल्या तपासणी अहवालानुसार सर्वाधिक ५३ गावे धारणी तालुक्यातील आहेत. अचलपूर तालुक्यातील एका गावामध्ये दूषित पाणी आढळून आले आहे.जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे. मध्यम जोखीमचे तालुकानिहाय गा.प.संख्याअमरावती १४,अंजनगाव सुजी ०४,अचलपूर २८,चांदूर रेल्वे ०३,धामनगांव रेल्वे ०७,चांदूर बाजार ११,तिवसा ०५, दर्यापूर ३३, नांदगाव खंडेश्र्वर ०५,वरूड ०२, माेर्शी ०५,भातकुली ००,चिखलदरा ०५,धारणी ५६ पिवळे कार्ड दिलेल्या ग्रामपंचायतींना खबरदारीघेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी दूषित होण्याची कारणे शोधण्यास तसेच याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घेण्यास सांगण्यात आले आहे. डॉ. सुभाष ढोले - जिल्हा आरोग्य अधिकारी. 

टॅग्स :Amravatiअमरावती