शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

अमरावतीकरांनो, विकास हवा असेल तर पाणी वाचवा!

By admin | Updated: March 22, 2016 00:21 IST

राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते.

जागतिक जलदिन : पाण्याचा अपव्यय ठरू शकतो घातक, अप्पर वर्धा धरण ठरले वरदानअमरावती : राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते. अलिकडे पाणीटंचाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उन्हाळा आला की राज्यात पाणीटंचाईची भीषण तीव्रता जाणवू लागते. सुदैवाने अमरावती जिल्ह्यात मात्र पाणीटंचाईचे सावट नाही. परंतु अमरावतीकरांनी मुबलक उपलब्ध असलेल्या पाण्याचे महत्त्व वेळीच ओळखायला हवे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवून भविष्यात अमरावतीचा मराठवाडा होऊ नये, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. अमरावतीत नळाची तोटी उघडताच शुद्ध पाणी मिळते. परंतु जे सहज मिळते त्याची किंमत न करणे, हा मानवी स्वभावगुण आहे. ‘मिल गया तो मिट्टी है, खो गया तो सोना है’ या उक्तीप्रमाणे मुबलक उपलब्ध असलेल्या पाण्याचा गैरवापर होऊ देऊ नये. शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरापासून ५५ किलोमिटर अंतरावरून सिंभोराधरणातून पाणी, शहरात पोहोचते. या धरणातील पाण्याचा साठा बहुदा त्यावर्षी पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतो. पाणी वितरणाची प्रक्रिया जरा समजून घेऊ या. धरणात साठविलेले पाणी पंपिंग स्टेशनमधून २२ किलोमिटर अंतरावरील नेरपिंगळाई येथील टेकडीवर पाईपलाइनद्वारे चढविले जाते. यासाठी ७५० हॉर्सपॉवरचे पाच पंप पंपिंग स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. नेरपिंगळाई येथे साठविलेले पाणी नंतर उतारामुळे (ग्रॅव्हिटीमार्फत) ३३ किलोमिटरचे अंतर पार करून शहरात आणले जाते. येथील जलशुद्धीकरण केंद्रात सात टप्प्यांमध्ये पाणी शुद्ध केले जाते. पश्चात त्या पाण्याचे वितरण होते. या प्रक्रियेचा महिन्याचा खर्च दोन कोटींच्या घरात आहे. कोणत्याही शहराचा विकास तेथील उद्योगधंद्यांवर अवलंबून असतो व उद्योग हे पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. त्यामुळेच विकासासाठी अमरावतीकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. गावाची, शहराची, राज्याची व देशाची प्रगती साधायची असल्यास आपल्याला पाण्याचे मोल समजावे लागेल व पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा लागेल. पाणी बचतीचे छोटे-छोटे उपाय अंमलात आणल्यास आपण भीषण पाणीटंचाईवर मात करू शकतो.- संदीप ताटेवार स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती