शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : गारपिटीने संत्रा उत्पादकांना 200 कोटी रुपयांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 16:44 IST

अमरावती जिल्ह्यात ११, १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यातील संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

अमरावती - अमरावती जिल्ह्यात ११, १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यातील संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. एक वर्षाच्या कालावधीत तीन वेळा अवकाळीमुळे संत्रा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. गारपीट व वादळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्रातील संत्रा उत्पादकांचे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्राउत्पादक व जाणकार व्यक्त करीत आहेत. 

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने चांदूर बाजार तालुक्यातील सुमारे ९ हजार, अचलपूरमध्ये ४ हजार, मोर्शी २ हजार ५०० व वरूड तालुक्यात १०० हेक्टरमधील संत्राबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्रा जाणकार वर्तवण्यात येत आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहे. चांदूर बाजार तालुक्यात आंबिया बहराचे सुमारे १२० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. अचलपूर तालुक्यात ५० कोटी तर मोर्शी तालुक्यात ३० कोटी रुपये, तर वरूड तालुक्यात १० कोटी रुपयांपर्यंत संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने अद्याप संत्रा बागायतदारांच्या नुकसानाची आकडेवारी जाहीर केली नाही. 

जिल्ह्यात ८७ हजार हेक्टर क्षेत्रात संत्राबागा आहेत. त्यापैकी ५५ हजार हेक्टरमधील संत्राबागा उत्पादनक्षम आहेत. यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहर घेतला जातो, तर २० हजार हेक्टर क्षेत्रात आंबिया बहरातून उत्पादन घेतले जाते. यंदा मृग बहर अत्यल्प आला, तर आंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात गळल्याने ११०० कोटीचे नुकसान झाले होते.  

मृग बहराच्या फुटीला अवरोध वरूड व मोर्शी तालुक्यात २८ मे २०१७ रोजी आलेल्या अवेळी पावसामुळे मृग बहर फुटीचे प्रमाण केवळ १० टक्क्यांपर्यंतच राहिले. अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आंबिया बहराची मोठी गळती झाली. ७ डिसेंबर २०१७ ला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ११३६ गावांमधील ५९ हजार ९५६ शेतक-यांच्या ५३ हजार ६१२ हेक्टरमधील आंबिया बहराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. याची मदत अद्याप मिळायची आहे. 

चांदूर बाजार तालुक्यात १२० कोटी रुपयांचे नुकसान गारपिटीने तालुक्यातील २० हजार ५५८ शेतकरी गारद झाले असून, आंबिया बहराचे सरासरी अंदाजे ९० कोटींचे आर्थिक नुकसान त्यांना झेलावे लागत आहे. मृग बहरालाही गारपिटीची झळ पोहोचल्याने त्याचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना अंदाजे ३० कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :HailstormगारपीटAmravatiअमरावती