शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील तरुणी प्रचंड दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:24 IST

शहर तथा जिल्ह्यातील महिला व तरुणी प्रचंड दहशतीत असून, महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी ठोस व कठोर पावले उचलायला हवी, असे राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेसने पत्रपरिषदेतून आवाहन केले. अमरावती पोलीस गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केला आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा आरोप,पोलिसांनी उचलावे पावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर तथा जिल्ह्यातील महिला व तरुणी प्रचंड दहशतीत असून, महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी ठोस व कठोर पावले उचलायला हवी, असे राष्ट्रवादी युवती महिला काँग्रेसने पत्रपरिषदेतून आवाहन केले. अमरावती पोलीस गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केला आहे.दौऱ्यावर असणाºया राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे, संगीता ठाकरे, रूपाली बुले, प्रदेश सचिव कल्पना वानखडे, राई देशमुख, संगीता देशमुख, छाया कडू, स्नेहा जाणे, पूजा कोठे, सरला इंगळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून पोलीस विभागावर ताशेरे ओढले. अमरावतीत भरदिवसा एका तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. यापूर्वीही महिलावरील हल्ले व अत्याचारांच्या घटना शहरात घडल्या आहेत. तरुण विद्यार्थिंनीवर होणाºया या हल्ल्याच्या घटना पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तरुणीवर सतरा चाकूचे वार केले जातात. हा अमानवीय प्रकार पुढे आला आहे. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यातील महिला व तरुणी स्वत:ला आता असुरक्षित समजू लागल्या आहेत. या गंभीर विषयाच्या अनुषंगाने सक्षणा यांनी शहरातील एका महाविद्यालयाला भेट दिली, त्यावेळी विद्यार्थिनीने नाव न सांगण्याच्या अटीवर ती प्रचंड दहशतीत व भीतीत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वरूड येथील एक विद्यार्थिनीदेखील भयभित झाल्याचे त्यांना आढळले. पोलीस महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे. पोलीस आयुक्त संजय बावीस्कर यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्याची गरज होती. परंतु, त्यांनी काहीच केले नाही. दामिनी पथकदेखील दिसेनासे झाले. राज्यातील गुन्हेगारीत अमरावती शहराची परिस्थितीही आता सर्वाची धोक्याची झाल्याचे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.सक्षणा यांचे डोळे पाणावलेराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी राजापेठ हद्दीत घडलेल्या हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी तरुणीची भेट घेतली. मैत्रिणीच्या हत्येचा थरारक अनुभव त्या तरुणीने भयभीत अवस्थेत सक्षणा यांना सांगितले. पत्रपरिषदेत बोलताना त्या तरुणीची व्यथा सांगताना सक्षणा यांचे डोळे पाणावले.विजया रहाटकर यांचे मौन का?राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांविषयक अनेक चांगले निर्णय घेतले. मात्र, महिलांच्या सुरक्षेविषयीच त्यांनी चुप्पी साधली आहे. भाजप आमदार राम कदमसह अन्य भाजप नेत्यांच्या महिलांविषयक भाष्यावर त्यांनी मौन धरले. महिलांच्या सुरक्षेविषयी कामकाज करताना अपमान केला जातो. याविषयी त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी केला आहे.मुख्यमंत्री धृतराष्ट्र असल्याची टीकाराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धृतराष्ट्र असल्याची टीका राष्ट्रवादीच्या महिलांनी पत्रपरिषदेतून केली. अमरावती शहरासह राज्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुर्लक्ष आहे. गृहखाते त्यांनी आता सोडले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षेला सरकार व पोलीस प्राधान्य देत नाही. आघाडी सरकारच्या कार्यकाळापेक्षा गेल्या पाच वर्षांत राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.