शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती- १५ वर्षांनंतर आढळला फॉस्टर्नचा मांजऱ्या साप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 15:04 IST

अतिदुर्मीळ जिवांच्या गटात मोडणारा आणि मेळघाटच्या जंगलात पाच वर्षांपूर्वी नोंद करण्यात आलेल्या फॉस्टर्नचा मांजºया साप चक्क बडनेरा येथील बस आगारात आढळला.

- धीरेंद्र चाकोलकरअमरावती : अतिदुर्मीळ जिवांच्या गटात मोडणारा आणि मेळघाटच्या जंगलात पाच वर्षांपूर्वी नोंद करण्यात आलेल्या फॉस्टर्नचा मांजºया साप चक्क बडनेरा येथील बस आगारात आढळला. वसा संस्थेचे सर्पमित्र भूषण सायंके व मुकेश मालवे यांनी शुक्रवारी बडनेरा आगर गाठून या सापाला वाचविले.वसा संस्थेचे प्राणिमित्र गणेश अकर्ते यांना बडनेरा आगरातील सुरक्षा रक्षक मारुती पंडित यांनी साप निदर्शनास आल्याची माहिती वसाला फोनवरून दिली. वसाचे भूषण सायंके व मुकेश मालवे यांनी हा साप पकडला तेव्हाच तो काही वेगळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सापाचा 'मार्फोमेट्रिक डेटा' व छायाचित्रे घेऊन पुण्याला पाठविली. पुण्याहून शुभम सायंके आणि गणेश अकर्ते यांनी मिळालेल्या सर्व माहितीचे आकलन करून, हा साप जिल्ह्यातील अतिदुर्मीळ ‘फॉस्टर्नचा मांजºया साप’ असल्याची पुष्टी केली. या सापाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जाता यावे, याकरिता वसाने उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांना लेखी अर्ज देऊन सदर सापाला पुन्हा मेळघाटात पाठविले. अमरावती वनविभागाने जलद निर्णय घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडे वाचविलेला साप सुपूर्द केला.तब्बल १५ वर्षांनंतर फॉस्टर्नचा मांजºया साप आढळल्याने सर्पमित्रांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वसाने घेतलेल्या या दुर्मीळ नोंदीबद्दल वन्यजीवप्रेमी निखिल फुटाणे, सागर शृंगारे, गोपाल बारस्कर, शैलेश आखरे, रीतेश हंगरे, मुकेश मालवे, आकाश वानखेडे यांनी अभिनंदन केले.

मेळघाटातच मांजºया सापाची नोंद मेळघाटमधील कोह व कुंड वगळता जिल्ह्यात मांजºया सापाच्या नोंदी कुठेच नाहीत. २००३ मधील एका शोधप्रबंधात या सापाचा उल्लेख आढळतो. त्याचे शास्त्रीय नाव 'बॉइगा फॉर्स्टनी' आहे. १२ डिसेंबर २००३ नंतर २०१८ मध्ये १५ जूनला हा साप पुन्हा आढळून आला. २००३ मध्ये आढळलेल्या सापाची लांबी ४ फूट ५ इंच होती, तर बडनेरा बस डेपोमधून रेस्क्यू केलेल्या सापाची लांबी ३ फूट ९ इंच आहे. अमरावतीमध्ये साधा मांजºया आणि फॉस्टर्नचा मांजºया असे कॅट स्नेकचे दोन प्रकार आढळतात. 

दीडशे किलोमीटरचा प्रवाससापाने मेळघाटातून बडनेरा आगारात तब्बल १५३ किमी अंतर बसने गाठल्याचा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला. १४ तारखेला सायंकाळी धारणीवरून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून बडनेरा आगरात पोहोचली. त्यात अनवधानाने हा साप चढला आणि सरळ उतरला तो १५३ किमी दूर बडनेराला.

पहिल्यांदाच मानवी वस्तीतफॉस्टर्नचा मांजºया साप हा निमविषारी असून, जिल्ह्यात खूप दुर्मीळ आहे. मानववस्तीतील ही या सापाची पहिलीच नोंद आहे. दाट आणि उंच झाडे असलेली मेळघाटच्या जंगलात हा साप मुख्यत: आढळतो. या सापाला लागणारा अधिवास जिल्ह्यात कायम आहे, याची पुष्टी या घटनेने झाली आहे.