शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: तंत्रशिक्षण अमरावती विभागीय कार्यालयासमोर फार्मसी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

By उज्वल भालेकर | Updated: November 20, 2023 19:29 IST

Amravati News: वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून जास्तीचे शुल्क तसेच नियमानुसार प्रयोगशाळा आणि क्लासरूम नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

- उज्वल भालेकर अमरावती - वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून जास्तीचे शुल्क तसेच नियमानुसार प्रयोगशाळा आणि क्लासरूम नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे येथे शिकत असलेल्या १४ विद्यार्थ्यांनी इतर महाविद्यालयात प्रवेश देण्याची मागणी तंत्रशिक्षण सहसंचालक विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली होती. परंतु अजूनही महाविद्यालय बदलून न मिळाल्याने या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थ्यांकडून विविध महाविद्यालयीन शुल्क आकारले जात नसून फार्मसी विभागामध्ये आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. येथे प्राध्यापक हे फक्त कागदोपत्री असून प्रत्यक्षात फक्त तीन ते चारच प्राध्यापक आहेत. तसेच मनमानी शुल्क आकारून विद्यार्थ्यांना ते शुल्क भरण्याची सक्ती करत परीक्षेला बसू न देण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी २९ ऑगस्टला केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने सहसंचालक तंत्रशिक्षण विभागाने २ सप्टेंबर रोजी चौकशी समिती स्थापन करून अहवालही सादर केला आहे. हा अहवालदेखील महाविद्यालयाच्या विरोधात असून पुढील कारवाईसाठी हा अहवाल तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालामध्ये संबंधित कॉलेजची मान्यता ही दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे म्हटले आहे. परंतु कॉलेज सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी होऊनही या ठिकाणी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश हे दुसऱ्या महाविद्यालयात ट्रान्सफर करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या संपामध्ये विजय कराळेे, पांडुरंग बराटे, ओम मोरे, रोहित शेलोकार, वेदिका दहीभाते, काजल आडे, अंशदा पोरे, साक्षी जाधव, श्रृती गौतम, सानिका काळे, कृतिका जोगदंड, पायल फुले आदी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही उपस्थित होते.

टॅग्स :AmravatiअमरावतीStudentविद्यार्थी