अमरावती : महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ८७ जागांच्या महापालिकेत अजून पर्यंत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकत पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे. भाजपने ९ जागांवर विजय मिळवला असून पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी ७ जागांवर यश मिळवले आहे.
युवा स्वाभिमान पक्षाने ३ जागा, तर MIM नेही ३ जागांवर विजय मिळवत आपली उपस्थिती ठळकपणे दाखवून दिली आहे. शिवसेना (शिंदे गट) ला १ जागेवर समाधान मानावे लागले असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ला २ जागा मिळाल्या आहेत. बसपाने १ जागा जिंकत खाते उघडले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निवडणुकीत अजूनपर्यंत एकही जागा मिळवता आली नसल्याने चित्र अजून अस्पष्ट आहे.
या निकालामुळे अमरावती महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून सत्ता स्थापन करण्यासाठी आघाड्या, युती आणि पाठिंब्याचे राजकारण रंगणार असल्याचे संकेत आहेत. महापौरपद कोणाच्या हाती जाणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
निवडणूक निकालानंतर विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या असून येत्या काही दिवसांत अमरावतीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : Amravati's municipal election yields a hung council. Congress leads with 13 seats, followed by BJP (9). NCP (Ajit Pawar) secured 7. Alliances and support will determine who governs. Political meetings underway.
Web Summary : अमरावती नगर निगम चुनाव में त्रिशंकु जनादेश। कांग्रेस 13 सीटों के साथ आगे, भाजपा को 9. राकांपा (अजित पवार) को 7 सीटें। गठबंधन से तय होगा शासन। राजनीतिक बैठकें जारी।