शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

अमरावती विभागातील १,६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त,  अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ४८७ ग्रापंचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:22 IST

विभागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात राबविलेल्या अभियानात तीन हजार ९२५ पैकी एक हजार ६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८७ ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यामधील आहेत.

अमरावती  - विभागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात राबविलेल्या अभियानात तीन हजार ९२५ पैकी एक हजार ६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८७ ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यामधील आहेत. यापैकी ६०७ ग्रामपंचायतींचे समितीच्या मार्फत तपासणी करण्यात येऊन शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. अमरावती विभागात एकूण तीन हजार ९२५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी २१६ ग्रामपंचायती मार्च २०१५ अखेर, तर २०१६-१७ मध्ये सद्यस्थितीत एक हजार ४३१ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या आहेत. ही ४२.०९ टक्केवारी आहे यापैकी ६०७ ग्रामपंचायतींचे समितीद्वारा तपासणीदेखील झालेली आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील ८३९ पैकी ४८७, अकोला जिल्ह्यातील ५३२ पैकी २१६, बुलडाणा जिल्ह्यातील ८६६ पैकी ३२४, वाशिम जिल्ह्यातील ४९० पैकी २१८, तर यवतमाळ जिल्ह्यातील १,१९८ पैकी ४०७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या आहेत.विभागातील सात तालुके हगणदारीमुक्त झालेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे व तिवसा, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व शेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव व वाशिम जिल्ह्यातील कारंजा या तालुक्यांचा समावेश आहे. २०१२ च्या सर्वेक्षणानुसार यासर्व तालुक्यात १,३९,६५४ कुटुंबे आहेत व यापैकी १,३९,४०२ कुटुंबाकडे शौचालय आहेत. ही ९९.८२ टक्केवारी आहे. चार लाख २६ हजार कुटुंबाकडे शौचालयेच नाहीतबेसलाईन सर्वेक्षणानुसार विभागात १५ लाख ३५ हजार कुटुंब आहेत. यापैकी ११ लाख १० हजार कुटुंबाकडे शौचालय आहेत. ही ७२.२३ टक्केवारी आहे. चार लाख २६ हजार कुटुंबाकडे अद्यापही शौचालय नाहीत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ५२,३७६, अकोला जिल्ह्यात ५०,२३३, बुलडाणा जिल्ह्यात १,१०,२४०, वाशिम जिल्ह्यात ६१,३३५ व यवतमाळ जिल्ह्यात १,५२,४०० कुटूंबाकडे शौचालय नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई