शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात शिक्षकांचे मोबाईलवर इलू-इलू, विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 13:48 IST

अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीगावच्या जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळेतील दोन शिक्षक कायमच मोबाईलवर व्यस्त राहत असल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देपालकांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारअंजनगाव सुर्जी तालुक्यात विहीगावातील प्रकार

सुदेश मोरेआॅनलाईन लोकमतअमरावती: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीगावच्या जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळेतील दोन शिक्षक कायमच मोबाईलवर व्यस्त राहत असल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.दोन्ही शिक्षक तासनतास मोबाईल बोलत असल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना सांगितले होते. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तक्रार केली आहे. हे दोन्ही शिक्षक मोबाईलवर वेळ गमावत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा पालकांचा आरोप आहे.पालकांचा उपोषणाचा इशारा‘हे मोबाइलप्रेमी शिक्षक आमच्या मुलांना शिक्षणापासून दूर नेत आहेत. या शाळेतील संबधित शिक्षक शाळेत कधीच वेळेवर येत नाहीत. आलेच तर कानात हेडफोन लावून गाणी एैकत असतात. अशा शिक्षकांची चौकशी व त्यांच्याविरु द्ध कारवाई करावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू,’ असे पालकांनी सांगितले. त्यांनी आंदोलनाचा इशारा देणारे एक निवेदन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.असा झाला खुलासासंबंधित शिक्षकांचे प्रेमसंबंध मोबईलवर अतिशय उतू गेल्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांनी कंटाळून ही बाब आपल्या पालकांच्या कानी घातली. यानंतर याची विचारणा शिक्षकांना करण्यात आली. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी, पालक पंचायत स्मतीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर संबंधित शिक्षकांना पंचायत समिती शिक्षण प्रशासनाने नोटीस देवून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे कळविले आहे.कॉल डिटेल्स काढण्याची मागणीसंबंधित शिक्षकांचे प्रत्येकी दोन मोबाईल क्र मांक सुद्धा प्रशासनास देण्यात आले आहेत. हे शिक्षक कुणाशी बोलतात, किती वेळ बोलले, याबाबतचे पूर्ण रेकॉर्ड काढण्याची मागणी सुद्धा निवेदनात केली आहे. शाळा उघडण्यापासून दांड्या मारणाऱ्या व आलेच तर मोबाईलवर बोलणाऱ्या या शिक्षकांवर कोणती कारवाई होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक