शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत २३२ महिला झाल्या रुग्णवाहिकेतच प्रसूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 11:29 IST

‘डायल १०८’ ही सुविधा सुरू झाल्यापासून राज्यात १५ हजार तर जिल्ह्यात २३२ गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत झाली, तर हजारो गर्भवतींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता आले. ही रुग्णवाहिका गर्भवती महिलांसाठी ‘संकटमोचन’ ठरली आहे.

ठळक मुद्देआरोग्य सेवा : ‘१०८’मध्येच डॉक्टर व सर्व सामग्री

आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘डायल १०८’ ही सुविधा सुरू झाल्यापासून राज्यात १५ हजार तर जिल्ह्यात २३२ गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत झाली, तर हजारो गर्भवतींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता आले. ही रुग्णवाहिका गर्भवती महिलांसाठी ‘संकटमोचन’ ठरली आहे.आरोग्य विभागाने अतितातडीच्या रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचा समावेश केला आहे. गर्भवतीस प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यास रुग्णवाहिका उपचारासाठी दाखल करते. अशावेळी प्रथम शासकीय रुग्णालयास प्राधान्य दिले जाते. रुग्णालयाच्या वाटेवर अनेक महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच होते. यामध्ये डॉक्टर उपलब्ध असल्याने आणि संबंधितांना प्रसूतीचे प्रशिक्षण दिल्याने महिलेची प्रसूती सुखरूप होते.रुग्णवाहिकेत प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर असतात. प्रसूतीसाठी आवश्यक असणारी साधनेही उपलब्ध असतात. प्रत्येक प्रसूतीच्या वेळी नवीन उपकरणांचा वापरही केला जातो. त्याचबरोबर रुग्णवाहिका जंतुनाशक औषधाची फवारणी करून साफ केली जाते. तत्पर व सुसज्ज सेवा यामुळे राज्यात १५ हजार १३९ प्रसूती या रुग्णवाहिकेत झाली आहे. अमरावती जिल्ह्यात २०१४ ते आॅगस्ट २०१६ पर्यंत २३२ एवढ्या महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत झाल्याचा आरोग्य विभागाकडे आकडा आहे.

टॅग्स :Healthआरोग्य