शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ मूकबधिर महिलेचा पत्ता शोधण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 22:28 IST

‘लोकमत’ने या महिलेची अडचण लोकदरबारात मांडल्यानंतर हे सारे घडून आले. 

गणेश देशमुखअमरावती  : कोराना संशयित म्हणून कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या, मूकबधिर असलेल्या, हिंदी-मराठी न कळणाºया, येथील जिल्हा रुग्णालयात अडकून पडलेल्या महिलेचा पत्ता शोधण्यात अखेर अमरावती जिल्हा प्रशासनाला यश आलेच. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी साडी-चोळी देऊन विशेष वाहनाने त्या महिलेला मंगळवारी रवाना केले. अवघे रुग्णालय निरोप द्यायला उपस्थित होते. ‘लोकमत’ने या महिलेची अडचण लोकदरबारात मांडल्यानंतर हे सारे घडून आले. 

आधार प्रणालीतून शोधला पत्ता‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी महिलेची रुग्णालयात भेट घेतली. पत्ता कळत नसल्याने ठणठणीत झाल्यावरही तिचा सांभाळ करण्याचे आदेश जिल्हा रुग्णालयाला दिले तसेच  महिलेच्या फिंगरप्रिंट्सवरून आधार प्रणालीद्वारे महिलेचा मूळ पत्ता शोधण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार रुग्णालयात तत्पुरते आधार केंद्र उभारले गेले. महिलेचे आधार कार्ड डिटेल काढण्याची पूर्ण प्रक्रिया पार पाडली गेली. पूर्वी कार्ड काढलेले असल्यामुळे ते आधार कार्ड मिळाले. त्यावर पत्ता होता. ६ मे रोजी दाखल झालेल्या त्या महिलेचा पत्ता शोधण्यासाठी महिनाभर अनेकांनी प्रयत्न केले. या प्रवासात दिव्यांग साहाय्यता केंद्राचे पंकज मुद्गल आणि नीरज तिवारी या दुभाषींंची उल्लेखनीय मदत झाली. 

ती आंध्र प्रदेशातील कुर्नूलचीत्या महिलेचे नाव के. मंजुळा असे आहे. त्या आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील मंदिगिरी (अडोणी) येथील रहिवासी आहेत. पालकमंत्री, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर, काळजी घेणा-या नर्स, प्रयत्न करणारे इतर लोक निरोप द्यायला उपस्थित होते. अमरावतीकरांच्या अशा प्रेमाने मंजुळाताई भारावल्या होत्या. 

कुर्नूल जिल्हा प्रशासनाशी संपर्कपालकमंत्र्यांच्या आदेशानुसार, अमरावती जिल्हा प्रशासनाने कुर्नूल जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. प्रवासाच्या आवश्यक परवानग्या तत्काळ मिळविण्यात आल्यात. विशेष वाहनाने महिलेला रवाना करण्यात आले. तहसील कार्यालयाचे प्रशांत पांडे हे अमरावती प्रशासनाचे प्रतिनिधी या नात्याने महिलेसोबत आहेत.