शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

अमरावती जिल्ह्यात १,५४६ गावांनी वेशीवरच रोखला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:46 IST

अमरावती : जिल्ह्यात १,५४६ गावांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमल करून कोरोनाचा संसर्ग गाव वेशीवर रोखला असल्याची सुखद वार्ता आहे.

ठळक मुद्दे१४१ गावांत आढळले ७७३ रूग्ण४३८ जणांची कोरोनावर मातग्रामीण भागात २९ जणांचा मृत्यू

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १३१ दिवसांत ३ हजार ४६७ कोरोना संक्रमितांची नोंद झाली. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्याच्या १४१ गावांमध्ये कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले आहेत. मात्र, १,५४६ गावांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमल करून कोरोनाचा संसर्ग गाव वेशीवर रोखला असल्याची सुखद वार्ता आहे.

अमरावती महापालिका क्षेत्रात हाथीपुरा भागात ४ एप्रिलला जिल्ह्यातील पहिल्या कोरोना संक्रमित रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात शिराळा येथे २ मे रोजी संक्रमित रुग्णाची नोंद करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ग्रामीण भागात बुधवारपर्यंत १४१ गावांत ७७३ कोरोना संक्रमितांची नोंद झाली. त्यापैकी ३०६ जणांवर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ४३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीण भागात २९ संक्रमितांचे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात ‘अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ या मोहिमेंतर्गत , १४ पंचायत समिती, १० नगर परिषद, चार नगरपंचायतींमध्ये गाव व वॉर्डनिहाय वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून चार वेळा सर्वेक्षण करण्यात आले. गावात बाहेरून आलेल्या व्यक्ती तसेच सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तीचा नोंदी घेण्यात आल्यात. बाहेरून आलेल्या व्यक्तींना सक्तीने स्थानिक शाळा, वसतिगृह इमारतींमध्ये १४ दिवस क्वारंटाईन करून आजारी व्यक्तीशी वारंवार संपर्क साधण्यात आला. आवश्यक तेव्हा तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तींची तपासणी तसेच त्यापैकी आजारी व्यक्तींना आवश्कयतेनुसार स्वॅब टेस्टकरिता रेफर करणे यांसारख्या उपाययोजना गावोगावी करण्यात आल्याने जिल्ह्यातील १३ आॅगस्टपर्यत दीड हजार गावे कोरोनामुक्त आहेत. गावकऱ्यांची सकारात्मक वृत्ती, त्याला प्रशासनाची समर्थ अशी साथ मिळाल्याने जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यास मदत झाली.

नेमके काय केले?१४ तालुक्यांतील प्रत्येक गावात १६ मार्चपासून कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीची स्थापना करण्यात आली.ग्रामस्तरीय कोरोना संनियंत्रण समितीद्वारे गावोगावी ’डोअर टू डोअर’ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.निर्जंतुकीरण करण्यासाठी धुरळणी व सोडियम हायपोक्लोराईडची नियमित फवारणी करण्यात आलीकोविड १९ चा संसर्ग गावात होऊ नये, याकरीता बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करु नये यासाठी नाकाबंदी.प्रत्येक व्यक्तीने नियमित हात धुणे, सॅनिटायझर, साबण तसेच चेहºयाला मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले.संसर्गापासून बचावासाठी जाहीर मुनादी, प्रसिध्दी पत्रक व ध्वनिक्षेपकाद्वारे प्रबोधन केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या