शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धारणी तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 19:58 IST

धारणी तालुक्यातील कुसुमकोट फाट्यावर एका तलाठ्यासह कोतवालाला रेती वाहतूकदाराकडून नऊ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

अमरावती - धारणी तालुक्यातील कुसुमकोट फाट्यावर एका तलाठ्यासह कोतवालाला रेती वाहतूकदाराकडून नऊ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी केली. साद्राबाडी आणि झिलपी परिसरात रात्री नदी-नाल्यातून अवैध रेती वाहतुकीसाठी आदिवासी ट्रॅक्टरमालकाकडून नऊ हजारांची लाच घेताना कुसुमकोट फाट्यावर धारणी येथील तलाठी देवेंद्र गजबलाल फूलमाली (४९) आणि कोतवाल दिनेश धांडे (३१) यांना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गजाआड केले. त्यांनी तक्रारदार रेती वाहतूकदाराला ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर २५ हजारांवर त्यांच्यात तडजोड झाली. यापैकी १४ हजार रुपये दिल्यानंतर उर्वरित नऊ हजारांसाठी तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. यामध्ये हे दोघे अलगद अडकले. धारणी तालुक्यात एक वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव नाही. तरीही शासकीय व निमशासकीय बांधकामांवर तसेच खासगी बांधकामांसाठी रेतीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. महसूल प्रशासनाचा ‘आशीर्वाद’ असल्याने रेती वाहतूकदार रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात उपसा करीत आहेत. त्यामुळे नदीपात्रात रेतीसाठा काहीच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेती वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन आपले खिसे भरणाºया अधिकाºयांविरोधात हे रेती वाहतूकदार एसीबीला तक्रार करताना दिसून येत आहे. कारवाई पथकात एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम बारड, चंद्रशेखर दहीकर, श्रीकृष्ण तालन, अभय वाघ, चंद्रकांत जनबंधू यांचा समावेश होता. 

एका महिन्यात दुसरी कारवाई एक महिन्यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धारणीत दुसरी कारवाई केली. यापूर्वी लाचखोर पोलिसाला दोन हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAmravatiअमरावती