शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: अमरावतीचे ईर्विन’ होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय; रुग्णसेवा बळकटी, विस्तारीकरणाचे व्हिजन

By गणेश वासनिक | Updated: October 14, 2023 18:38 IST

Amravati : अमरावती जिल्ह्याची आरोग्य संजीवनी संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) आता ८०० खाटांचे होणार आहे.

- गणेश वासनिक अमरावती - जिल्ह्याची आरोग्य संजीवनी संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) आता ८०० खाटांचे होणार आहे. त्याकारिता आमदार सुलभा खोडके यांच्यासह आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून नवीन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहर तसेच धारणी, मेळघाट तसेच मध्यप्रदेशाच्या सीमाभागातून रुग्ण उपचारासाठी ईर्विनमध्ये दाखल होतात. तसेच सद्या रुग्णालयात ३९० बेड्स उपलब्ध असल्याने एका बेडवर दोन पेशंट अशी स्थिती आहे. त्यामुळे इर्विनमध्ये वाढीव ४०० खाटांची संख्या म्हणजेच एकूण ८०० खाटांचे नवीन हॉस्पिटल साकारण्याचा संकल्प आहे. अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने आमदार खोडके यांनी पुढाकार घेतला आहे. डफरीन परिसरात इर्विनसाठी ४०० खाटांचे रुग्णालय थाटण्यात येणार आहे. यासंदर्भात आमदार खोडके यांनी आरोग्य प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेसोबत जागेची ऑन दी स्पॉट पाहणी केली.

यावेळी आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण साळुंके, सुपरचे कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, जिल्हा स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, अधीक्षक वैद्यकीय अधिकारी -तलत खान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रूपा राऊळ-गिरासे, उपविभाग क्रमांक-१ चे उपविभागीय अभियंता तुषार काळे, उप-विभागीय अभियंता श्रीकृष्ण गोमकाळे, शाखा अभियंता एन. प्रकाश रेड्डी, कनिष्ठ अभियंता पी. आर. गोधे, ईर्विनचे कनिष्ठ लिपिक राजू सानप, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कार्यालयीन अधीक्षक स्मिता नंदागवळी, सहाय्यक अधिक्षक रवींद्र तुरे,कनिष्ठ लिपिक तुळजागीर गिरी, रवींद्र मेटकर, नितीन बोरकर, स्वाती चांदोरे, वंदना चव्हाण, पल्लवी बोबडे, अधिसेविका-जया सौदागरे,कल्पना टवलारे, पदमा खंडाते आदी उपस्थित होते . सद्या इर्विनमध्ये वाढता रुग्णसेवेचा व्याप सांभाळताना आरोग्य यंत्रणेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे ८०० बेडचे नवीन हॉस्पिटल साकारण्याचा संकल्प केला असून मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणीनुसार शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. - सुलभा खोडके, आमदार

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल