शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

राज्यातील पाच हजार गावांना ‘पोखरा’ची मात्रा, हवामानाकूल पीक बदलाद्वारे शाश्वत उत्पन्नावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:12 IST

लहरी हवामानामुळे शेतीपिकावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील ५,१४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) राबविण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सहा वर्षांपर्यंत असणा-या या प्रकल्पासाठी सद्यस्थितीत गाव समित्या, गावसमूह व पहिल्या टप्प्यातील गावांमध्ये राबविण्याच्या कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे. 

 - गजानन मोहोड 

अमरावती  - लहरी हवामानामुळे शेतीपिकावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील ५,१४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) राबविण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सहा वर्षांपर्यंत असणा-या या प्रकल्पासाठी सद्यस्थितीत गाव समित्या, गावसमूह व पहिल्या टप्प्यातील गावांमध्ये राबविण्याच्या कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांमध्ये ६ वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यामध्ये ४ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यापैकी २,८०० कोटी जागतिक बँकेकडून अल्प व्याजदारात कर्जस्वरूपात उपलब्ध होणार आहे, तर राज्य शासनाचे स्वनिधी १२०० कोटींची गुंतवणूक यामध्ये राहणार आहे.  प्रकल्पांतर्गत गाव समूहातील प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन  आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व सरपंचाच्या अध्यक्षतेखालील कृषी संजीवनी समितीद्वारे गावात कामे सुरू करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकºयांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे, शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मूल्य साखळीत त्याचा सहभाग वाढविणे, शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करणे, हा उद्देश आहे. क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, भूजल पुनर्भरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी विक्री आदीबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतक-यांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामानाकुल वाण विकसित करणे आदी घटक आहेत.

राज्यातील १५ जिल्ह्यांचा समावेश- या प्रकल्पात विदर्भातील २,०५४ गावांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातीळ ४९८, अमरावती ५३२, बुलडाणा ४४१, वाशिम १४९, यवतमाळ ३०९ तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील १२५ गावांचा समावेश आहे.- मराठवाड्यातील ३,०८८ गावे प्रकल्पात आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ४०६, बीड  ३९१, हिंगोली २४०, जळगाव ४६०, जालना ३६३, लातूर २८२, नांदेड ३८४, उस्मानाबाद २८७ वपरभणी जिल्ह्यातील २७५ जावांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेतीAmravatiअमरावती