आॅनलाईन लोकमतअमरावती : अचलपूर ते अमरावती रस्त्याची दर्जोन्नती करण्यात आली असून हा मार्ग आता प्रमुख जिल्हा मार्ग ८७ म्हणून ओळखला जाईल. प्रमुख राज्यमार्ग क्र. १४ ते मार्की, निरूळ गंगामाई, मिर्झापूर ते राज्य मार्ग क्रमांक २८७ ला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्याच्या दर्जोन्नतीने प्रमुख जिल्हा मार्गाच्या लांबीत १७ किमीने वाढ होऊन आता या मार्गाची लांबी १६६१.२१० किमी अशी झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांचा प्रस्ताव, रस्त्यावरील वाहतूक, गावांची संख्या, लोकसंख्या व रस्त्याचा एकूण होणारा वापर तसेच अमरावती जिल्हा परिषदेची मागणी विचारात घेऊन हा रस्ता ‘प्रमुख जिल्हा मार्ग’ म्हणून दर्जोन्नत करण्यात आला.सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावतीच्या मुख्य अभियंत्यांनी त्यासाठी १८ सप्टेंबर २०१७ व २१ फेब्रुवारी २०१८ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला होता.सदर प्रस्तावित रस्ता मार्की, निरूळ, गंगामाई, मिर्झापूर, महिमापूर या यात्रेचे ठिकाणी व पर्यटन स्थळांना जोडणारा आहे. पूर्णानगर ते वाठोडा शुक्लेश्वर या २०० चौ. कि.मी. क्षेत्रफळामध्ये फक्त ५० किमी डांबरी पृष्ठभागाचे आहेत. सर्व रस्ते पूर्णा नदीला समांतर असून पूर्णा नदीला ओलांडणारा एकही प्रमुख जिल्हा मार्ग अथवा राज्यमार्ग नाही. सदर रस्त्याची दर्जोन्नती झाल्यास या भागातील रस्ते विकासाचा समतोल साधला जाणार आहे. त्या अनुषंगाने अमरावती-अचलपूर या रस्त्याची दर्जोन्नती करण्यात आली आहे.
अमरावती-अचलपूर मार्गाची दर्जोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:05 IST
अचलपूर ते अमरावती रस्त्याची दर्जोन्नती करण्यात आली असून हा मार्ग आता प्रमुख जिल्हा मार्ग ८७ म्हणून ओळखला जाईल. प्रमुख राज्यमार्ग क्र. १४ ते मार्की, निरूळ गंगामाई, मिर्झापूर ते राज्य मार्ग क्रमांक २८७ ला जोडणारा हा रस्ता आहे.
अमरावती-अचलपूर मार्गाची दर्जोन्नती
ठळक मुद्दे१७ किमीने लांबी वाढली : बांधकाम विभागाच्या प्रस्तावाला मान्यता