शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

८९५ लाडक्या लेकीच्या खात्यात ४५ लाख रुपये जमा, जिल्हा राज्यात अव्वल, प्रत्येक पाच हजारांचा पहिला हप्ता

By जितेंद्र दखने | Updated: March 15, 2024 20:25 IST

Amravati News: महिला व बालविकास विभाग व मार्फत मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी या योजना राबविण्यात येतात त्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या लेक लाडकी या योजनेतून अमरावती जिल्ह्यातील ९८५ मुलींच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता याप्रमाणे ४५ लाख रुपये जमा केले

- जितेंद्र दखनेअमरावती - महिला व बालविकास विभाग व मार्फत मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी या योजना राबविण्यात येतात त्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या लेक लाडकी या योजनेतून अमरावती जिल्ह्यातील ९८५ मुलींच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता याप्रमाणे ४५ लाख रुपये जमा केले असून उर्वरित मुलींनासुद्धा लवकरच याचा लाभ दिला जाणार आहे.

शासनाने यापूर्वी पूर्वी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी असलेली माझी कन्या भाग्यश्री ही योजना आता लेक लाडकी या योजनेत बदलली आहे. या योजनेअंतर्गत मुलींचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता मुलगी आणि आई यांच्या संयुक्त खात्यावर जमा करण्यात येतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता असे असे एकूण १ लाख १ हजार रुपये मुलींच्या खात्यांवर जमा करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून ज्या पालकांनी आपल्या मुलींच्या नावाची नोंदणी महिला बालविकास विभागाकडे केली आणि सर्व प्रमाणपत्राची पूर्तता केली अशा ८९५ मुलींना ४५लाख रुपयांचे वाटप केले असून उर्वरित पात्र मुलींनासुद्धा टप्प्याटप्प्याने रक्कम देण्यात येणार आहे. किंवा ज्या पालकांनी अद्यापही आपल्या मुलीचे नावे नोंदणी केले नसतील त्या पालकांनी तात्काळ अंगणवाडी सेविकांकडे आपल्या बालिकांचे नाव नोंदणी करून शासनाकडून मिळणाऱ्या एक लाख एक हजार रुपये रकमेचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके यांनी केले आहे. लेक लाडकी योजनेचे जिल्ह्यात अतिशय उत्तम काम सुरू असून महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सूक्ष्म नियोजनात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. तेव्हा पालकांनी आपल्या मुलींची नावे अंगणवाडी सेविकाकडे नोंदवावी.- संजीता मोहपात्रा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती. तालुकानिहाय लाभार्थीअमरावती १२२,भातकुली ९८, दर्यापूर ३१, तिवसा ५५, वरुड ११०, मोर्शी ८१,चांदूर रेल्वे ९५, धामणगाव रेल्वे ३७,नांदगाव खंडेश्वर ८२, अचलपूर ७५, अंजनगाव सुर्जी ४४,चांदूरबाजार ४२,धारणी ०३, चिखलदरा २० एकूण ८९५

टॅग्स :AmravatiअमरावतीLek Majhi Ladkiलेक माझी लाडकी