शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

Amravati: बडनेरा ते वर्धा सेक्शनवर आता ३० ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावणार

By गणेश वासनिक | Updated: November 22, 2023 18:10 IST

Amravati News: बडनेरा ते वर्धा यादरम्यान सेक्शनवर आता ३० रेल्वे गाड्या प्रतितासी १३० किमी. वेगाने धावत आहे. गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी अनेक विभागांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत.

- गणेश वासनिक अमरावती - बडनेरा ते वर्धा यादरम्यान सेक्शनवर आता ३० रेल्वे गाड्या प्रतितासी १३० किमी. वेगाने धावत आहे. गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी अनेक विभागांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. यामध्ये मल्टी-ट्रॅकिंग (एका विभागात अनेक ट्रॅक टाकणे), ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामे यांचा समावेश आहे. या कामांमुळे मध्य रेल्वेला या बडनेरा ते वर्धा विभागांवर ताशी १३० किमी वेगाने बुधवारपासून गाड्या चालवता आल्या आहेत.

मध्य रेल्वे सध्या एकूण १२०६.७३ किमी म्हणजे ९५.४४ किमी, इगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा सेक्शनवर ५२६.६५ किमी, पुणे ७५९ किमी असे एकूण १२०६.७३ किमी अंतर कापून १३० किमी प्रतितास वेगाने गाडया चालवत आहे.सुरक्षेच्या सर्व बाबी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणी केल्यानंतर या गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. यामुळे गाड्यांची धावण्याची वेळ कमी होईल आणि ट्रेनच्या हालचालींची एकूण वक्तशीरता सुधारणार आहे.

 बुधवारपासून या गाड्यांचा प्रतितास १३० किमी वेग- लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया सुपर फास्ट द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस- लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम सुपर फास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस- लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी सुपर फास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस- लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्स्प्रेस दैनिक- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा साप्ताहिक सुपर फास्ट एक्सप्रेस- पुणे-संत्रागाची-पुणे साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस- लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या कर्मभूमी साप्ताहिक एक्स्प्रेस- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हावडा दुरांतो आठवड्यातून चार दिवस-गोंदिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेस डेली- नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस डेली- लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस- लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी टर्मिनस साप्ताहिक एक्स्प्रेस- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा टर्मिनस सुपर फास्ट दैनंदिन- लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार समरसता द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेAmravatiअमरावती