शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

विदर्भातील दुष्काळी तालुक्यांना १,३१५ कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 16:53 IST

खरीप-२०१८ मध्ये राज्यात तीव्र व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर १५१ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली.

ठळक मुद्देखरीप-२०१८ मध्ये राज्यात तीव्र व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर १५१ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली.विदर्भातील ३८ दुष्काळग्रस्त तालुक्यांना १,३१५ निधी मिळणार आहे.मदतनिधीमध्ये राज्यातील दुष्काळसदृश स्थिती जाहीर केलेले २६८ महसूल मंडळांसह ९३१ गावांना डावलल्याचे स्पष्ट झाले.

अमरावती : खरीप-२०१८ मध्ये राज्यात तीव्र व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर १५१ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. हा निधी दोन समान टप्प्यात वितरित केला जाईल. यामध्ये विदर्भातील ३८ दुष्काळग्रस्त तालुक्यांना १,३१५ निधी मिळणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५० टक्के निधी वितरणास मान्यता मिळाली आहे. मदतनिधीमध्ये राज्यातील दुष्काळसदृश स्थिती जाहीर केलेले २६८ महसूल मंडळांसह ९३१ गावांना डावलल्याचे स्पष्ट झाले.

केंद्राच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून राज्यातील १८० तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पीक नुकसानीचे सत्यापन करण्यात आल्यावर  ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी शासनाने ११२ तालुक्यांत गंभीर, तर ३९ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. याच तालुक्यांत २५ जानेवारी २०१९ रोजी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील निधी वितरणासदेखील मान्यता दिली. यामध्ये जिरायती बाधित क्षेत्राला देय ६,८०० रूपये हेक्टरच्या ५० टक्के प्रमाणात व बागायती बाधित क्षेत्राला देय १८ हजार रूपये हेक्टरच्या ५० टक्के मर्यादेत पहिला टप्पा मिळणार आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेत हा निधी मिळणार आहे. मात्र, ६ नोव्हेंबर २०१८ व ८ जानेवारी २०१९ च्या निर्णयाप्रमाणे दुष्काळसदृश स्थिती जाहीर २६८ महसूल मंडळे व ९३१ गावांना या मदतनिधीतून डावलण्यात आले आहे. या सर्व गावांना केवळ दुष्काळाच्या आठ प्रकारच्या सवलतींवरच समाधान मानावे लागणार आहे.

विदर्भातील बाधित जिल्ह्यांना मदत (कोटीमध्ये)

    जिल्हा          देय निधी       मान्यता      पहिला हप्ता    बुलडाणा      २८८.८८      २२८.३५        ५९.१६    अकोला        १९१.११        ८१.५५          ४०.७७    वाशीम         ६३.८२         २६.१४          १३.०७    अमरावती    २६९.६५      ११०.१४         ५५.२२    यवतमाळ    ३३६.६५       १३७.८९       ६८.९४    वर्धा              १४.६२         ५.९८           २.९९    नागपूर         ८२.३८         ३३.७४         १६.८७    चंद्रपूर         ५९.९०          २४.५३         १२.२६    एकूण         १३१५.०१       ५३८.६२       २६९.३१

टॅग्स :droughtदुष्काळAmravatiअमरावतीWaterपाणी