शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

आंबियाला विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:54 IST

पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदाच्या हंगामात संत्रा, मोसंबी, डाळींब, केळी, आंबा व लिंबू आदी पिकांच्या आंबिया बहरासाठी लागू करण्यात आली.

ठळक मुद्देउत्पादकांना दिलासा : सोबतच डाळींब, केळी,लिंबू पिकांनाही लागू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदाच्या हंगामात संत्रा, मोसंबी, डाळींब, केळी, आंबा व लिंबू आदी पिकांच्या आंबिया बहरासाठी लागू करण्यात आली. फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. कर्जदार शेतकºयांसाठी ही योजना सक्तीची तर गैरकर्जदार शेतकºयांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे. संत्राच्या आंबिया बहरासाठी जिल्ह्यातील ७९ महसूल मंडळात ही योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेसंदर्भात कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावाला राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने २२ सप्टेंबरला मान्यता दिल्यानंतर कृषी विभागाने गुरुवारी ही योजना निवडक जिल्ह्यामध्ये लागू केली. ‘महावेध’द्वारा स्थापन केलेल्या हवामान केंद्राची व जेथे ही सुविधा उपलब्ध नाही तेथे त्रयस्त संस्थेद्वारा स्थापन केलेल्या हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेली आकडेवारी तसेच योजनेत नमूद फळपीकनिहाय प्रमाणके यांची सांगड घालून शेतकºयांना सबंंधित विमा कंपनी शेतकºयांना नुकसान भरपाई देणार आहे. याचे दायित्व शासनावर राहणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.कमी किंवा जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकºयांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. संत्रा पिकासाठी अवेळी पाऊस एक डिसेंबर २०१७ ते १५ जानेवारी २०१८, कमी तापमान १६ जानेवारी ते २८ जानेवारी, जास्त तापमान एक मार्च ते ३१ मे, तसेच गारपीटसाठी एक जानेवारी ३० एप्रिल २०१८ असा विमा संरक्षित कालावधी आहे. विमा कंपनीकडून पीकनिहाय प्रती हेक्टरी प्राप्त वास्तवदर्शी विमा हप्ता दर व शेतकºयांनी प्रत्यक्ष भरावयाचा विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता समजण्यात येईल.व हे अनुदान केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात दिल्या जाणार आहे.संत्रासाठी या महसूल मंडळांचा समावेशअमरावती तालुक्यात अमरावती, वडाळी, नवसारी, बडनेरा, डवरगाव, मांहुली जहांगीर, नांदगाव पेठ. भातकुली तालुक्यात निंभा. चांदूर रेल्वे तालुक्यात चांदूर रेल्वे, पळसखेड, घुईखेड, आमला विश्वेश्वर, घुईखेड, सातेफळ. धामणगाव तालुक्यात चिंचोली, भातकुली, अंजनसिंगी, मंगरूळ दस्तगीर, दढापूर, तळेगाव दशासर. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नांदगाव खंडेश्वर,दाभा, शिवणी, मंगरूळ चव्हाळा, पापळ, लोणी, धानोरा गुरव, माहुलीचोर. मोर्शी तालुक्यात अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर, धामणगाव, नेरपिंगळाई, शिरखेड, मोर्शी वरूड तालुक्यात वरूड, बेनोडा, पुसला, वाढोडा, वणी, शेंदूरजनाघाट, राजुरा बाजार. तिवसा तालुक्यात तिवसा, मोझरी, वºहा, कुºहा, वरखेड. चांदुरबाजार तालुक्यात चांदुरबाजार, ब्रम्हणवाडा थडी, बेलोरा, शिरजगाव, करजगाव, तळेगाव मोहना. अचलपूर तालुक्यात अचलपूर, रासेगाव, असतपूर, परसापूर, पथ्रोट, परतवाडा. चिखलदरा तालुक्यात चिखलदरा, सेमाडोह, टेंबूरखेडा व अंजनगाव सुर्जी तालुक्यात अंजनगाव, भंडारज, विहिगाव, सातेगाव, कापूसतळणी व कोकर्डा या मंडळांचा समावेश आहे.