शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन प्रतिनिधी गाडगेबाबांच्या कार्याने भारावले, अमरावती विद्यापीठाला दिली भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 20:12 IST

अमेरिकन प्रतिनिधी भारत दौ-यावर आले असता त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मंगळवारी भेट दिली. गाडगेबाबांच्या कार्याने ते भारावून गेलेत. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन अमेरिकन व भारतीय शिक्षण पद्धतीवरदेखील त्यांनी चर्चा केली.

अमरावती : अमेरिकन प्रतिनिधी भारत दौ-यावर आले असता त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मंगळवारी  भेट दिली. गाडगेबाबांच्या कार्याने ते भारावून गेलेत. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन अमेरिकन व भारतीय शिक्षण पद्धतीवरदेखील त्यांनी चर्चा केली.  विद्यापीठाने संशोधनावर अधिक भर देऊन शिक्षण पद्धती ही पदवीपेक्षा व्यवसायाभिमुख असावी, विद्यार्थ्यांमधील संस्कारमूल्य वृद्धींगत होण्यासाठी भर द्यावा, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून अमेरिका आणि भारत देशात विद्यार्थी व युवकांचे सांस्कृतिक व क्रीडाविषयक आदान-प्रदान व्हावे आदी विषयांवर चर्चा झाली. अमेरिकन प्रतिनिधींनी आम्हाला भारत देश खूप आवडला. येथील लोकांच्या जीवनपद्धती, राहणीमान अतिशय चांगली आहे. अमरावती विद्यापीठाचा परिसर निसर्गरम्य असून वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीमधून विश्व कल्याणाचा संदेश देण्यात आल्याबाबत त्यांनी मनस्वी समाधान व्यक्त केले. संत गाडगेबाबांच्या जीवनावरील गॅलरी बघून आम्ही भारावल्याचे अमेरिकन प्रतिनिधींनी व्यक्त केले.प्रतिनिधींमध्ये ब्रॉड पालमर, जेस अ‍ॅडम्स, नतालिना पेजर, ग्रॅसी पालमर, मॅथ्यू मार्टिन, ब्रिटनी गार्नर, हॉर्मोनी गार्नर, डेव्हिड पट, कटेलीन पट, टेलर पट, तुलीया हस, जेसिका हॅरिसन, कर्ट कॅम्बेल, मैकी कॅम्बेल यांचा समावेश होता. अमेरिकन प्रतिनिधींनी विद्यापीठातील संत गाडगेबाबा अध्यासन व स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राला भेट देऊन छायाचित्र गॅलरीची पाहणी केली.याप्रसंगी कुलसचिव अजय देशमुख, एम.बी.ए. विभागप्रमुख संतोष सदार, श्री संत गाडगे बाबा अध्यासनाचे समन्वयक दिलीप काळे, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक एस.के. ओमनवार, प्राचार्य डी.जी. वाकडे,  अमरसिंग राठोड, प्रणव नितनवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती